AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात झपाट्याने पसरतोय कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट, या राज्यात सर्वाधिक संक्रमित

covid 19 : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ कायम आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हाच व्हेरिएंट भारतात दहा राज्यांमध्ये आढळला आहे. त्यामुळे चिंता वाढत आहेत. कोरोनाच्या या प्रसारावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पण तरी देखील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचं कारण बनला आहे.

देशात झपाट्याने पसरतोय कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट, या राज्यात सर्वाधिक संक्रमित
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 02, 2024 | 6:05 PM
Share

Corona update : कोरोना JN.1  व्हेरिएंट झपाट्याने वाढत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 573 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4,565 वर पोहोचली आहे.  भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-19 च्या नवीन प्रकार JN.1 ची एकूण 263 प्रकरणे देशात आतापर्यंत नोंदवली गेली आहेत, त्यापैकी जवळपास निम्मी केरळमध्ये आढळली आहेत.

10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण

भारतात आतापर्यंत 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. INSACOG नुसार, केरळ (133), गोवा (51), गुजरात (34), दिल्ली (16), कर्नाटक (8), महाराष्ट्र (9), राजस्थान (5), तामिळनाडू (4), तेलंगणा (4), ओडिशा (1) या राज्यांच्या यात समावेश आहे. डिसेंबरमध्ये नव्या व्हेरिएंटची 239 प्रकरणे आढळली आहे. नोव्हेंबरमध्ये 24 प्रकरणे आढळली होती.

अनेक देशांमध्ये JN.1 चा संसर्ग वाढला

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 चे त्याच्या जलद जागतिक प्रसारानंतर परीक्षण करण्यासाठी एक प्रकार म्हणून वर्गीकरण केले आहे, परंतु JN.1 मुळे होणाऱ्या अतिरिक्त सार्वजनिक आरोग्य जोखमींबाबत मर्यादित उपलब्ध पुरावे देखील विचारात घेतले आहेत. सध्या जागतिक स्तरावर आरोग्य धोके कमी लेखले जात आहेत.

अलिकडच्या आठवड्यात, JN.1 ची प्रकरणे अनेक देशांमधून सातत्याने नोंदवली जात आहेत. देशात कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या आणि JN.1 प्रकार आढळून येत असताना केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत जागरुक राहण्यास सांगितले आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल