AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे…

ती जिथे बसली होती, तिथे सहा मुले आली. ते तिच्यावर वाईट कॉमेंट करत होते. तिने याला विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या शरिराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. परिस्थिती एवढी बिघडली की तिला जागेवरुन उठून दरवाजात यावे लागले.

छेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे...
Samstipur a girl jumped from trainImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 18, 2022 | 10:04 PM
Share

समस्तीपूर– जनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जात असलेल्या २२ वर्षांच्या विद्यार्थिनीने, (22 years girl)  ट्रेनमध्ये होणाऱ्या छेडछाडीला (harassments)कंटाळून चालत्या ट्रेनमधून (jumped from train) मारल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये हा प्रकार घडलाय. ही मुलगी गंभीर अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेली ग्रामस्थांना दिसली. त्यानंतर या मुलीला रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या दोन्ही पायांवर, हातांवर आणि डोक्यावत गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचे दातही तुटले आहेत. ही मुलगी मुज्जफपूरमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे भरदिवसा हा प्रकार घडला आहे. ट्रेनमध्ये इतरही अनेक प्रवासी होते, पण कुणीही या मुलीच्या मदतीला पुढे आले नाही.

नेमका काय घडला प्रकार

दुपारच्या सुमारास ही मुलगी मुज्जफरपूरमधून बैरानीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली होती. ती जिथे बसली होती, तिथे सहा मुले आली. ते तिच्यावर वाईट कॉमेंट करत होते. तिने याला विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या शरिराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. परिस्थिती एवढी बिघडली की तिला जागेवरुन उठून दरवाजात यावे लागले. तिने घरी मदतीसाठी फोन केला. तेव्हा तिचा फोन या सहा गुंडांनी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या सहाजणांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. ट्रेनमध्ये अनेक प्रवासी होते, पण कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही, हे आणखी एक दु्र्दैव.. काय करायचे हे समजत नव्हते, अशा स्थितीत या मुलीने ट्रेनधून उडी मारण्याचा निर्णय घेतला.

आरोपींना ओळखत नव्हती

या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की त्या सहा मुलांना ओळखत नव्हती. या मुलीने जेव्हा ट्रेनमधून उडी मारली त्यावेळी ती गंभईर जखमी झाली आणि बेशुद्ध पडली होती. स्थानिकांना ती जखमी अवस्थेत रुळांच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत सापडली. मुलीचे दोन्ही पाय, हात आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. ट्रेनची गती जोरात होती, या अपघातात तिचे दातही तुटले आहेत.

अद्याप आरोपींना अटक नाही

ही मुलगी बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मुलगी सापडताच पहिल्यांदा तिच्यावर उपचार करण्य़ास सुरुवात केली. त्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांना बोलावण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला दुसरीकडे हलवण्यात आले आहे. अद्याप या आरोपींची ओळख पटलेली नाही. ओळख पटली की तातडीने त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?