छेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे…

ती जिथे बसली होती, तिथे सहा मुले आली. ते तिच्यावर वाईट कॉमेंट करत होते. तिने याला विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या शरिराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. परिस्थिती एवढी बिघडली की तिला जागेवरुन उठून दरवाजात यावे लागले.

छेडछाडीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून विद्यार्थिनीने मारली उडी, मुलीने सांगितले, शरिराला स्पर्श करत होते, त्यामुळे...
Samstipur a girl jumped from train
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 10:04 PM

समस्तीपूरजनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जात असलेल्या २२ वर्षांच्या विद्यार्थिनीने, (22 years girlट्रेनमध्ये होणाऱ्या छेडछाडीला (harassments)कंटाळून चालत्या ट्रेनमधून (jumped from train) मारल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये हा प्रकार घडलाय. ही मुलगी गंभीर अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेली ग्रामस्थांना दिसली. त्यानंतर या मुलीला रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या दोन्ही पायांवर, हातांवर आणि डोक्यावत गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचे दातही तुटले आहेत. ही मुलगी मुज्जफपूरमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे भरदिवसा हा प्रकार घडला आहे. ट्रेनमध्ये इतरही अनेक प्रवासी होते, पण कुणीही या मुलीच्या मदतीला पुढे आले नाही.

नेमका काय घडला प्रकार

दुपारच्या सुमारास ही मुलगी मुज्जफरपूरमधून बैरानीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली होती. ती जिथे बसली होती, तिथे सहा मुले आली. ते तिच्यावर वाईट कॉमेंट करत होते. तिने याला विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या शरिराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. परिस्थिती एवढी बिघडली की तिला जागेवरुन उठून दरवाजात यावे लागले. तिने घरी मदतीसाठी फोन केला. तेव्हा तिचा फोन या सहा गुंडांनी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या सहाजणांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. ट्रेनमध्ये अनेक प्रवासी होते, पण कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही, हे आणखी एक दु्र्दैव.. काय करायचे हे समजत नव्हते, अशा स्थितीत या मुलीने ट्रेनधून उडी मारण्याचा निर्णय घेतला.

आरोपींना ओळखत नव्हती

या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की त्या सहा मुलांना ओळखत नव्हती. या मुलीने जेव्हा ट्रेनमधून उडी मारली त्यावेळी ती गंभईर जखमी झाली आणि बेशुद्ध पडली होती. स्थानिकांना ती जखमी अवस्थेत रुळांच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत सापडली. मुलीचे दोन्ही पाय, हात आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. ट्रेनची गती जोरात होती, या अपघातात तिचे दातही तुटले आहेत.

अद्याप आरोपींना अटक नाही

ही मुलगी बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मुलगी सापडताच पहिल्यांदा तिच्यावर उपचार करण्य़ास सुरुवात केली. त्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांना बोलावण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला दुसरीकडे हलवण्यात आले आहे. अद्याप या आरोपींची ओळख पटलेली नाही. ओळख पटली की तातडीने त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.