
सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट प्रकरणात एक मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणात पत्नीने बीएमडब्ल्यू कार आणि १२ कोटीची पोटगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेतल्यानंतर वैवाहिक विवाद प्रकरणात निकाल दिला आहे. न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी सांगितले की दोन्ही पक्षांना एकमेकांविरोधात खटला दाखल करण्यास रोखण्यात येत आहे. तसेच घटस्फोटाचा अर्ज देखील मंजूर करण्यात आला आहे. या निकालाने पत्नीला मुंबईतील फ्लॅट मिळाला आहे. मात्र बीएमडब्ल्यु कार आणि कोट्यवधीची मागणी फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती चंद्रन यांनी सांगितले की मुंबईतील फ्लॅट गिफ्ट डीडद्वारा दिला जाईल. यावेळी किचिंत स्मित करीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की फ्लॅट सोबत मिळणारे दोन पार्किंग शिवाय बीएमडब्ल्यू देखील द्याव्यात ! या प्रकरणात पत्नीने बीएमडब्ल्यू आणि १२ कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करीत म्हटले होते तुम्हाला केवळ फ्लॅट मिळले अन्यथा तोही मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील एका घटस्फोट प्रकरणात महिलेने तिच्या पतीशी विभक्त होत कोर्टाकडून पोटगी म्हणून १२ कोटीची मागणी केली होती. यासोबत महिलेने पती खूप श्रीमंत असल्याने अपार्टमेंट आणि एक बीएमडब्ल्यू कार देखील देण्यात यावी. कोर्टात ही मागणी झाली तेव्हा तेथे उपस्थित असलेले सर्वजण अवाक झाले होते.
या सुनावणी आधी कोर्टाने सांगितले होते की, एक कोणत्याही कायदेशीर दाव्यातून मुक्त एक फ्लॅट स्वीकार करावा वा एक रकमी ४ कोटी रुपये रक्कम घेऊन मान्य करावे.विशेष म्हणजे महिला स्वत:च आपल्या केस लढवत होती. कोर्टाने सांगितले की जेव्हा तुम्ही स्वत: उच्च शिक्षित आहातच आणि स्वत:च्या इच्छेने काम न करण्याचा निर्णय घ्यावा. एक तर तुम्ही चार कोटी रुपये घ्यावे आणि पुणे, हैदराबाद, बंगळुरुत कोणतीही चांगली नोकरी शोधावी. आयटी क्षेत्रात सहज नोकरी मिळेल असा न्यायालयाने सुनावले होते. या प्रकरणात आज अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात आपला निकाल दिला आहे.