पोटगी म्हणून मागितले 18 कोटी, मुंबईत घर आणि BMW कार, सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय
सर्वोच्च न्यायालयात पोटगीसंदर्भातील एका हाय-प्रोफाइल घटस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. घटस्फोटाच्या बदल्यात पोटगी म्हणून महिलेने १२ कोटी रुपये आणि मुंबईत फ्लॅटची मागणी केल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात एक हाय प्रोफाईल घटस्फोटाचे प्रकरणात मागितलेल्या पोटगी संदर्भात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्याने या पीडित महिलेल्या वकीलांना आपल्या अशिलासाठी पोटगी म्हणून मागितले 18 कोटी, मुंबईत घर आणि BMW कार मागितली आहे. ही मागणी पाहून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.
१८ महिन्याचे लग्न आणि १२ कोटीची पोटगी
सर्वोच्च न्यायालयात पोटगीसाठी आलेल्या प्रकरणातील विवाह १८ महिन्यांपूर्वी झालेला आहे. यातील महिला एक आयटी प्रोफेशनल असून मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (एमबीए) उत्तीर्ण आहे. या महिलेच्या वतीने वकीलांनी आपल्या अशिलाला केवळ मुंबईत एक फ्लॅट आणि १२ कोटी रुपये हवे आहेत. ही रक्कम मेटेनन्स म्हणून मागण्यात आली आहे.
यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आश्चर्यचकीत होऊन म्हटले की, ‘लग्न तर केवळ १८ महिने टीकले आहे. आणि तुम्ही प्रत्येक महिन्यासाठी एक कोटी मागत आहात. आणि वर एक BMW देखील तुम्हाला हवी आहे.’
आत्मनिर्भरतेचा सल्ला
सरन्यायाधीश गवई म्हणाले की, ‘तुम्ही बंगलुरु आणि हैदराबाद सारख्या शहरात आरामात नोकरी करु शकता. तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात. तुम्हाला स्वत:साठी असे मागू नये. त्याऐवजी स्वत कमवून जगायला हवे.’
महिलेचा पलटवार आणि FIR चा हवाला
महिलेच्या वकीलाने युक्तीवाद करताना आपल्या अशिलाला पतीने मानसिक रोगी सांगून लग्न रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर एफआयर देखील दाखल केली होती.ज्यामुळे तिच्या नोकरीवर परिणाम झाला. कोर्टाने हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या महिलेवरील एफआयआर रद्द करण्याचा आदेश आम्ही देऊ म्हणजे नोकरीत तुम्हाला काहीही अडचण येणार नाही असे स्पष्ट केले.
पतीच्या वकीलाने युक्तीवादात सांगितले की महिलेच्या मागणी मोठी आहे. आणि तिने परस्पर सांमजस्यानेच घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या होत्या. त्यात ठरले होते की तिला कल्पतरु पर्यावास सोसायटीत एक फ्लॅट दिला जाईल आणि यानंतरच दोन्ही पक्षाच्या सहमतीने २० हून अधिक प्रकरणे मागे घेतली जातील असे ठरले.परंतू आता दुसऱ्या टप्प्यात महिला घटस्फोटास नकार देत आणि अधिक पैशांची मागणी करीत आहे.जो कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे.
कोर्टाची की टिप्पणी: मुंबईत प्रत्येक स्पेसची किंमत
सरन्यायाधीश यावेळी टिप्पणी करताना हे ही म्हणाले की महिला ज्या फ्लॅटमध्ये रहात आहे. त्यात दोन पार्किंग स्पेस देखील आहेत. ज्याचा वापर मुंबईसारख्या शहरात चांगल्या प्रकारे करता येईल.
अंतिम निकाल सुरक्षित
सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला आहे.आता सुप्रीम कोर्टा या हाय-प्रोफाईल घटस्फोट प्रकरणात काय निकाल देते याकडे लक्ष लागले आहे.
