आता स्वदेशी फायटर जेटने Air Strikes…याच महिन्यात Tejas MK1A करणार धमाका
Tejas MK1A Fighter Jet : पाक-भारत तणावात एक आनंदवार्ता आली आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात अजून एक पाऊल पुढं टाकलं आहे. पाकड्यांना धडकी भरवण्यासाठी लवकरच भारताच्या संरक्षण भात्यात तेजस MK-1A लढाई विमान दाखल होत आहे.

HAL Nashik Tejas MK1A : भारताने पाकला ऑपरेशन सिंदूरमधून धूळ चारली आहे. भारतीय ब्रह्मोसने या काळात कमाल केली. तर फायटर जेटने पण सरस कामगिरी दाखवली. संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) लवकरच LCA तेजस MK-1A फायटर जेट भारतीय वायुदलाकडे (IAF) सोपवणार आहे. भारतीय संरक्षणा क्षेत्रातील ही मोठी कामगिरी ठरणार आहे. भारत आता अत्याधुनिक हत्यारे, उपकरणंच नाही तर हवाई क्षेत्रातही प्रगती करत आहे. अमेरिकेच्या GE एअरोस्पेसने इंजिन देण्यास उशीर केल्याने या प्रकल्पाचे कार्य एक वर्षे मागे पडले आहे. इंजिन उत्पादन क्षेत्रात पण भारताने आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहे.
Tejas MK1A मध्ये खास काय?
LCA तेजस MK1A हे लढाई विमान, Tejas MK1 पेक्षा सरस आणि प्रगत आहे. हे भारतीय वायुदलाच्या मल्टीरोल फायटर जेट स्वरुपात डिझाईन करण्यात आले आहे. मिग -21 ला पर्याय म्हणून Tejas MK1A मैदानात उतरणार आहे.
वेग : जवळपास ताशी 2,200 किमी
रेंज : इन फ्लाईट रिफ्युलिंगसह 1,850 किमी
वजन : 13,500 किलोग्रॅम
इंजिन : GE F404-IN20 टर्बोफॅन, 85 केएन थ्रस्ट
शस्त्रे : 7 हार्डपॉईंट, 23 मिमी GSh -23 तोफ, Astra BVR मिसाईल, ब्रह्मोस-NG
सेन्सर : EL/M-2052 AESA रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुईट, स्वदेशी डेटालिंक
किंमत : प्रति जेट जवळपास 580 कोटी रुपये
उत्पादन : HAL चे बेंगळुरू आणि नाशिक येथून 24 जेट्स प्रत्येक वर्षाला उत्पादन
केव्हा मिळणार हे फायटर जेट
HAL च्या नाशिकमधील कारखान्यातून Tejas MK1A ची पहिली खेप जून 2025 च्या अखेरपर्यंत मिळेल. भारतीय वायुदलासाठी हे विमान महत्त्वपूर्ण ठरेल. GE F404 इंजिन उशीरा मिळाल्याने हे लढाई विमान भारतीय संरक्षण दलात उशीराने दाखल होत आहे. पण आता नाशिक आणि बेंगळुरू येथील कारखान्यातून उत्पादन गती वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी काही खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. Tejas MK1A, हे F-47, Su-57, J-35A इतके प्रगत नाही. पण कमी खर्चात स्वदेशी बनावटीच्या या विमानची जगभरात चर्चा सुरू आहे. या विमानाच्या पुढील चाचणी, प्रत्यक्ष वापरानंतर त्यातील त्रुटी आणि अपेक्षा समोर येतील. पण तोपर्यंत भारताची या क्षेत्रातील पाऊल हा कौतुकाचाच विषय नाही तर संरक्षण क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.
