
जबलपुर : BAPS श्री स्वामीनारायण संस्थेच्या वतीने जबलपुरात आयोजित जीवन उत्कर्ष महोत्सवाच्या तिसरा दिवस प्रेरणा, भक्ती आणि जीवन मुल्यांच्या सुंगधाने सुवासित झाला. आजचा विषय होता ‘दुसऱ्याच्या उत्कर्षात आपला उत्कर्ष’. या कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी सहा वाजता संगिताच्या सुराने आणि किर्तनाने झाला. त्यात संत आणि तरुणांच्या भावपूर्ण भक्तीगीतांनी वातावरण भक्तीमय झाले.
यानंतर व्हिडीओद्वारे “BAPS संस्था परिचय” चे प्रदर्शन केले गेले, त्यात संस्थेचे जागतिक सेवाकार्य, शैक्षणिक प्रकल्प आणि आध्यात्मिक कार्याचा संक्षिप्त परिचय देण्यात आला.
यावेळी मुख्य वक्ता पूज्य ज्ञानवत्सल स्वामीजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण आपल्या विकासाला दुसऱ्यांच्या प्रगतीसोबत जोडतो. त्यांनी उदाहरणे आणि प्रेरक कथांद्वारे सांगितले की दुसऱ्यांचा उत्कर्षात सहयोग देणे हाच सेवेचा श्रेष्ठ मार्ग आहे. स्वामीजींच्या शब्दांनी उपस्थिती जनसमुहात आत्मविश्वास आणि सहअस्तित्व आणि सेवेची नवी चेतना जागृत झाली.
त्यानंतक ,’समाज सेवेचे प्रवर्तक – महंत स्वामी महाराज’ या विषयावर एक विशेष व्हिडीओ प्रस्तुत करण्यात आला, त्यात त्यांची करुणा, सेवा आणि मानवतेशी जोडलेल्या प्रेरक कार्यांना दर्शवण्यात आले.
BAPS संस्थेने सेवा आणि संस्कारच्या माध्यमातून समाजात सकारात्मकतेचा जो दीप पेटवला आहे. तो सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या राकेश सिंह ( मंत्री,मध्य प्रदेश ) यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की महंत स्वामी महाराजाच्या जीवनात जी नि:स्वार्थता आणि विनम्रता आहे. ती सच्च्या नेतृत्वाची ओळख आहे.त्यांचा जबलपुरातील जन्म आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या प्रसंगी पूजनीय बदरीप्रपन्नाचार्यजी महाराज देखील उपस्थित होते. महंत स्वामी महाराज यांच्या जन्मभूमीवर आयोजित या जीवन उत्कर्ष महोत्सवाच्याबद्दल शुभेच्छा देताना त्यांनी सनातन धर्माच्या पोषण तसेच संवर्धनासाठी बीएपीएस संस्थेच्या द्वारा जागतिक स्तरावर होत असलेल्या कार्याचे कौतूक केले.
अखेरच्या सत्रात पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी समारोपणात सांगितले की जेव्हा मनुष्य आपल्या क्षमतांना गुरुच्या आज्ञेत राहून समाज हितात लागतो, तेव्हा जीवनाला वास्तविक अर्थ मिळत असतो. यानंतर पाहुण्यांचा सत्कार आणि आरतीनंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला.
सकाळी पूज्य आदर्शजीवन स्वामीजीद्वारे प्रस्तुत “महंत चरितम” पारायणाच्या तृतीय दिवसाचा लाभ देखील भक्तांना प्राप्त झाला. ज्यात महंत स्वामी महाराजाच्या बालपणातील गुण, संस्कार आणि गुरु जीवनातील प्रसंगांनी सर्वाच्या हृदयाला स्पर्श झाला.
या कार्यक्रमात जबलपूर आणि आजूबाजूच्या नगरातून हजारो श्रद्धाळु उपस्थित होते. संतांची उपस्थिती, भावपूर्ण किर्तन, व्हिडीओ प्रदर्शन आणि प्रेरक प्रवचनांना संपूर्ण वातावरण आध्यात्मिकता आणि सेवाभावाने परिपूर्ण झाले.
संस्कारधानी जबलपुरातील जीवन-संस्काराचा हा महोत्सव उद्या ‘संतपरंपरांचे योगदान’ विषयाला समर्पित असेल, ज्यात विविध आश्रमांचे संत-महंत उपस्थित राहितील.