AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सोने स्वस्त, जाणून घ्या आजचा सोने आणि चांंदीचा भाव, पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही..

Todays Gold Rate : मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोने स्वस्त झाले. सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे मोठे आवाहन केले. त्यानंतर आज सोन्याचा भाव घसरला आहे.

Todays Gold Rate : सोने स्वस्त, जाणून घ्या आजचा सोने आणि चांंदीचा भाव, पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही..
Todays Gold Rate
| Updated on: May 14, 2026 | 11:12 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात चढउतार बघायला मिळत आहे. यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आवाहन करत पुढील 1 वर्ष सोने न खरेदी करण्यास सांगितले. या आवाहनानंतर सोन्याच्या किमती घसरल्या. त्यानंतर थेट केंद्र सरकारने आदेश काढत मोठा दणका दिला. सोन्याचे 6 टक्के आयात शुक्ल वाढून थेट 15 टक्के केले, ज्याने एकच खळबळ उडाली. सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. दोन दिवस सोन्याच्या किमती वाढताना दिसल्या. आता नुकताच आजचे सोन्याचे भाव पुढे आलीत. 14 मे 2026 रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली.  एमसीएक्सवर सोन्याचा भाव 301 रुपयांनी घसरला. चांदीच्या भावातही घसरण झाली.

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,62,10 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,48,510 आहे. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,62,160 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम ₹1,48,660 आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,63,680 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,50,10 आहे. पुणे आणि बंगळूरुमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,62,10 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,48,510 आहे.

14 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम ₹3,10,100 पर्यंत गेला. सोन्याच्या भावावरील आयात कर वाढवल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली. मात्र, कालच्या तुलनेत आज सोने स्वस्त झाले. इराण आणि अमेरिका युद्धाचा सर्वात जास्त सोन्यावर परिणाम झाला. सोन्याचे भाव या युद्धापूर्वी दोन लाखाच्या आसपास पोहोचले होते. आता त्यांच्यात घसरण झाली. पुन्हा आता सरकारने मोठा निर्णय घेतला.

सरकारने एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. परकिय चलनावरील ताण कमी करण्याकरिता हा निर्णय घेतला. व्यापार तुट टाळण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत आहे जिथे सर्वात जास्त सोने आयात केले जाते. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केट पडताना दिसत आहे. रूपयांवर गंभीर परिणाम होत आहे. यादरम्यान सरकारकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. सोने खरेदीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट