AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. पाकिस्तानची मान शरमेने जाणारी बाब […]

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

पाकिस्तानची मान शरमेने जाणारी बाब समोर आली आहे. पाकिस्तानने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी पुरेसा इंधनसाठाच उपलब्ध नसल्याचं समजतंय. खुद्द पाकिस्तानी मीडियानेच याबाबत वृत्त दिलंय. त्यामुळे भारताकडून बदला घेण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने स्वतःची परिस्थिती पाहिलेलीच नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. बदला घेण्याची भाषा पाकिस्तानकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील नौसेरा भागात पाकिस्तानने विमाने घुसवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडल्याचं बोललं जातंय.

देशातील विमानतळं आणि शहरांमध्ये हायअलर्ट

खबरदारीचा उपाय म्हणून देशातील काही विमानतळे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजस्थानमधील जैसलमेर हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं शहर आहे. या शहरातील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गुजरातमधील पूँछमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली