AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM-Kisan योजना नेमकी कुणासाठी? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही केंद्र सरकारची आर्थिक मदत!

PM-Kisan Yojana - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची योजना आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य मिळते. मात्र, योजनेची अंमलबजावणी केल्या नंतर आजही एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे दुसर्‍याच्या जमिनीवर काम करणार्‍या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का नाही?

PM-Kisan योजना नेमकी कुणासाठी? 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही केंद्र सरकारची आर्थिक मदत!
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 9:11 AM
Share

शेती हा भारतातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या गरजा वेळच्या वेळी पूर्ण व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही महत्वाकांक्षी योजना २०१९ साली सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते.

या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम एकदाच न देता, वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये विभागून दिली जाते. दर हप्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होतात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले आहेत, आणि या योजनेमुळे लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

मात्र या योजनेशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा अनेक शेतकऱ्यांना संभ्रमात टाकतो तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन नाही, पण ते दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात, त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर स्वतःची शेतीची जमीन नोंदणीकृत आहे.

सरकारने योजनेचे निकष निश्चित करताना मालकी हक्काला विशेष महत्त्व दिले आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन नसेल, तर त्या व्यक्तीला या योजनेसाठी पात्र मानले जात नाही. दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणारे भाडेकरू शेतकरी, कंत्राटी शेती करणारे किंवा जमीन नसलेले शेतीवर काम करणारे मजूर यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेचा मूळ उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन त्यांचा शेतीतील खर्च थोडासा हलका करणे हा आहे. त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे. अर्जदाराच्या नावावर जमीन असल्याचा दस्तऐवज म्हणजे ७/१२ उतारा, मालकी पत्रिका किंवा खरेदीखत आवश्यक असते.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे आणि मालकीचे पुरावे व्यवस्थित तपासूनच अर्ज करणे गरजेचे आहे. अन्यथा पात्रता न ठरल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्याआधी आपले सर्व शेतजमिनीचे दस्तऐवज अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?