असे चोर तुम्ही कधीच पाहिले नसतील; चोरीच्या आधी करतात पूजा, जामिनासाठी ठेवतात राखीव निधी

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक जेव्हा चोरी करण्यासाठी आपल्या गावाबाहेर पडतात तेव्हा आधी पूजा आणि विशिष्ट प्रकारचं धार्मिक व्रत करतात.

असे चोर तुम्ही कधीच पाहिले नसतील; चोरीच्या आधी करतात पूजा, जामिनासाठी ठेवतात राखीव निधी
| Updated on: May 15, 2025 | 5:53 PM

तामिळनाडूच्या श्रीरंगम तालुक्यातल्या रामजी नगर गावामध्ये एक गँग राहाते, या गँगमधील व्यक्ती बाहेरून सामान्य लोकांप्रमाणेच दिसतात, गावातील लोक देखील त्यांना इमानदार आणि कष्टाळू समजतात. मात्र जेव्हा ही गँग आपल्या गावातून बाहेर पडते तेव्हा ते प्रोफेशनल चोर बनतात. चोरी हाच आपला व्यवसाय असल्याचं हे लोक समजतात, जसं एखाद्या घरामध्ये अनेक पिढ्यांपासून एखादा व्यवसाय सुरू असतो, पुढे तोच आजोबाचा व्यवसाय नातू करतो तसंच काहीसं या लोकांचं आहे, ते चोरीलाच आपला पिढगत व्यवसाय मानतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक जेव्हा चोरी करण्यासाठी आपल्या गावाबाहेर पडतात तेव्हा आधी पूजा आणि विशिष्ट प्रकारचं धार्मिक व्रत करतात. ते आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करतात की आजच्या चोरीमध्ये यश मिळू द्या. त्यांचा असा समज आहे की, जर ईश्वर आणि आपल्या पूर्वजांची मर्जी असेल तरच आपली चोरी यशस्वी होते.

महागड्या वाहनांवर लक्ष

हे चोर चोरी करण्यासाठी गावातून बाहेर पडतात, ते ज्या भागामध्ये चोरी करायची आहे, त्या भागाची काळजीपूर्वक निवड करतात. हे लोक महागड्या गाड्यांवर लक्ष ठेवून असतात. जिथे यांना एखादी माहागडी कार दिसते, त्या कारची काच हे दगड किंवा इतर साधनांच्या मदतीने फोडतात आणि त्या कारमधील किमंती ऐवज घेऊन फरार होतात. हे लोक जेव्हा एकमेकांसोबत बोलतात तेव्हा सामान्य भाषेत न बोलता एका विशिष्ट कोड वर्ल्ड मध्ये बोलतात त्यामुळे इतरांना त्यांची भाषा कळत नाही.

एवढंच नाही तर चोरी केल्यानंतर एखाद्यावेळी आपण पकडले देखील जाऊ, या विचारानं जमानतीसाठी लागणारा खर्च ते चोरी केल्यानंतर आधीच बाजुला काढून ठेवतात. तसेच चोरी केलेल्या किमती ऐवजाचा देखील ते पूर्णपणे नियोजन करून वाटणी करतात. यातील एका आरोपीला पोलिसांनी नुकतंच अटक केलं, त्याने पोलीस चौकशीमध्ये आपण चोरी कशी करतो, गँगमध्ये कोण- कोण आहे? याची माहिती पोलिसांना दिली आहे.