मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा, Gen Z ला मोठा सल्ला

Sonam Wangchuk Gen Z: जंतरमंतरवर 26 दिवसांचे उपोषण करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सोनम वांगचुक यांनी देशाचे लक्ष वेधले. आंदोलन मागे घेण्यात आले. उपचारानंतर वागंचुक हे त्यांच्या हिमालयाच्या कुशीतील त्यांच्या गावी पोहचले. तिथून त्यांनी पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी जेन झी पिढीला मोठा संदेश दिला.

मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही... गावी पोहचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा, Gen Z ला मोठा सल्ला
सोनम वांगचुक
| Updated on: Aug 01, 2026 | 8:23 AM

सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जंतर मंतरवर CJP च्या आंदोलनस्थळी उपोषण केले. 26 दिवस त्यांचे उपोषण चालले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. उपचारानंतर ते हिमालयाच्या कुशीतील त्यांच्या गावी पोहचले. तिथे पोहचताच त्यांनी साथीदारांसाठी आणि Gen Z साठी एक व्हिडिओ संदेश दिला. वागंचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. “मित्रांनो, मी माझ्या गावी पोहचलो आहे. माझ्या पाठीमागे मावळतीचा सूर्य आणि सिंधु नदी आहे. येथे मी आराम करत आहे. मी पुन्हा ऊर्जावान होत आहे.” असा संदेश देतानाच त्यांनी मोठा संदेशही दिला आहे.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, कुटुंबांना भरपाई द्या

काश्मीर मध्ये दाखल झालो, तेव्हा सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली. सरकारने मला लिखित आश्वासन दिले आहे. ते सरकारने पूर्ण करायला हवे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होता कामा नये. तर नीट पेपरफुटीनंतर देशात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी. आता ती वेळ आली आहे. प्रत्येक गोष्ट त्यावेळेला पूर्ण व्हावी. तरच त्याची किंमत असते. हे मी सरकारला आठवण करून देऊ इच्छितो, असे वांगचुक म्हणाले.

आपल्याला भक्त नाही व्हायचं

यावेळी वांगचुक यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांना समर्थन देणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. रेल्वे इंजिनियरिंग प्रकल्पाविषयी मला अभिमान आहे. इतक्या बिकटस्थितीत काश्मीरमध्ये हा प्रकल्प राबवल्या जात आहे. या प्रकल्पावरून मी सरकारचे कौतुक करत होतो. यामुळे काही लोक नाराज होते. आपण इतके संकुचित असावे का? मंगळ ग्रहावर काही वर्षांनी अंतराळवीर उतरतील तर आपण त्याचे कौतुक करणार नाही का? असा सवाल त्यांनी टीकाकारांना केला.


भारतीय रेल्वे विभाग, अनेक अभियंते, राबणारे हात, अधिकारी मिळून रेल्वेचे काम सुरू आहे. रुळाचे काम करण्यात येत आहे. कृपया जरा मन मोकळे करा. पक्ष कोणता ही असो, विरोधात कोणी असो. हा देश आपल्या सर्वांना मिळून तयार करायचा आहे. तुम्हाला भक्त व्हायचे नाही. चुकीला चूक तर चांगल्याला चांगलं म्हणायचे आहे, असे वांगचुक यांनी सल्ला दिला.  सोनम वांगचुक यांचे आंदोलन सरकारने मोडून काढले होते. त्यांना जंतरमंतरवरून उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा , जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी मध्यरात्री उपोषण सोडले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us