
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सहकार्यवाह( RSS) दत्तात्रय होसबाळे यांच्या एका भाषणाची सध्या चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत नुकताच ‘समिधा’ या पुस्तकाचे विमोचन झाले. त्या कार्यक्रमात होसबाळे यांनी सध्यस्थितीतील विविध मुद्यांवर थेट मतं मांडली. ‘विश्वगुरू’ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय समाजातील अवगुणांवर त्यांनी प्रकाश टाकला. देशाला जगात पुढे जाण्यासाठी त्यांनी महत्त्वाचा कानमंत्र ही दिला. काय म्हणाले होसबाळे?
समाजाला या प्रदूषणांचा विळखा
सध्या उपभोगवाद वाढल्याची चर्चा होसबाळे यांनी केला. त्यांनी समाजाला काही प्रदूषणांचा, अवगुणांचा सामना करावा लागते असल्याचे ते म्हणाले. मनुष्यात अनैतिकता, भ्रष्टाचार, अहंकार, स्वतःला, समाजाला धोका देण्याचे, आळस, इतरांवर अतिक्रमण करण्याच्या प्रदूषणांचा समाजाला विळखा पडला आहे आणि ते समाजासाठी, मनुष्यासाठी घातक असल्याचे होसबाळे म्हणाले. मनुष्याला यापासून वाचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, ते सार्थक होण्यासाठी, सत्कारणी लागण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी यापासून समाजाने वाचावे. आज आपण एका आव्हानात्मक काळातून मार्गाक्रमण करत असल्याचे होसबाळे म्हणाले.
विश्वगुरू होण्यासाठी कानमंत्र
त्यामुळे संघाने पंच परिवर्तनाची हाक दिल्याचे ते म्हणाले. हलकं-भारी समाजण्याचे, हा आपला, तो दुसऱ्याचा समजण्याची समस्या समाजात असल्याचे ते म्हणाले. मानवी व्यवहारातून या गोष्टी झिरपल्याचे ते म्हणाले. संघाच्या समरसतेतून या बाबी दूर करण्यावर त्यांनी भर दिला. आपल्या देशाचे सत्व जागृत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कोणीशी वादवितंडवाद नाही. संघर्ष नाही. द्वेष नाही. हे विश्वची माझे घरं अशी आपली सभ्यता आहे. आपण सर्वांना कुटुंब मानतो. पण याचा अर्थ समाजाने स्वतःचे सत्व, आपली परंपरा, आपली क्षमता, ताकद, सामर्थ्य विसरावे असे होत नाही असे त्यांनी सांगितले.
आपला ज्वाज्वल्य इतिहास आहे. आपल्या ग्रंथात, पुस्तकात त्याची माहिती आहे म्हणून आपण मोठे आहोत असे सांगितले तर कोणी मानणार नाही. पण समाज तसा सचोटीने वागला तर जगासमोर ते उदाहरण तयार असेल यावर होसबाळे यांनी जोर दिला. जेव्हा भारताचा जगात डंका वाजत आहे, तेव्हा आपल्याला एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. विश्वगुरू होण्यासाठी काय काय करावे लागेल याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बाळ आपटे यांच्या 13 व्या पुण्यतिथी निमित्त मध्यप्रदेशातील सताना येथे डॉ. राकेश मिश्र यांच्या समिधा या पुस्तकाचे दत्तात्रेय होसबाळे यांनी विमोचन केले. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. होसबाळे यांनी आपटे यांच्या जीवनकार्यावर यावेळी प्रकाश टाकला. त्यांच्या सत्वशील आयुष्यावर बोलताना एका अधिकारी पदावर असताना सुद्धा ते कार्यकर्त्यात राहत असत, ही मोठी बाब असल्याचे ते म्हणाले.