‘ही’ आहे जगातील सर्वात विषारी मुंगी; नाग आणि विंचवापेक्षाही भयानक दंश
जेव्हा विषारी जीवांचा विषय येतो, तेव्हा तुमच्या पुढे साप, विंचू अशा गोष्टी समोर येतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? जगात अशा काही मुंग्यांच्या प्रजाती आहेत, ज्या साप किंवा विंचवापेक्षाही खतरनाक आणि विषारी असतात.

जेव्हा विषारी जीवांचा विषय येतो, तेव्हा तुमच्या पुढे साप, विंचू अशा गोष्टी समोर येतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? जगात अशा काही मुंग्यांच्या प्रजाती आहेत, ज्या साप किंवा विंचवापेक्षाही खतरनाक आणि विषारी असतात. या मुंग्यांचा डंख इतका विषारी असतो की त्या विषापुढे विंचू आणि नागाचं विष देखील काहीच नाही. या मुंग्यांच्या डंखामुळे वेळेत उपचार मिळाला नाही तर प्रसंगी व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो.वैज्ञानिकांच्या मते या मुंग्यांच्या डंखामध्ये एवढी ताकद असते, की जर तुम्हाला एखादी मुंगी चावली तर तुम्हाला एखादी बंदुकीची गोळी लागल्यानंतर जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास या मुंग्यांच्या दंशामुळे होऊ शकतो. आज आपण जागतील सर्वाधिक विषारी चार मुंग्यांच्या प्रजातीबद्दल जाणून घेणार आहोत.
बुलेट मुंगी (Bullet Ant) ही मुंगी मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलामध्ये आढळून येते. या मुंगीनं चावा घेतल्यानंतर तुम्हाला बंदुकीची गोळी लागल्यानंतर जेवढा त्रास होतो, त्याहीपेक्षा अधिक त्रास या मुंगीच्या चाव्यामुळे होतो, म्हणून या मुंगीला बुलेट मुंगी असं म्हणतात.
बुलडॉग मुंगी (Bulldog Ant) – या मुंगीचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे ही मुंगी आधी आपल्या जबड्यानं चावा घेते, आणि नंतर शरीरामध्ये विष सोडते. या मुंगीचं विष इतकं भयानक असतं की वेळेत उपचार मिळाला नाही तर व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
फायर मुंगी (Fire Ant) या मुंगीनं चावा घेतल्यानंतर व्यक्तीला सर्व अंगाला जळाल्यानंतर जशी वेदना होते, तेवढ्या तीव्रतेची वेदना होते. या मुंगीच्या विषाचा प्रभाव खूप जास्त असतो. मुंगीने दंश केल्यानंतर संपूर्ण अंगावर फोडं येतात. त्यामुळे या मुंगीला फायर मुंगी असं म्हणतात. ही मुंगी दक्षिण अमेरिकेमधील जंगालांमध्ये आढळते.
आर्मी मुंगी – ही मुंग्यांची अशी जात आहे, या मुंग्या समुहानं एखाद्या व्यक्तीवर हल्ला करतात. यांच्या चाव्यामध्ये एवढं विष नसतं, मात्र शरीराची प्रचंड आग होते.