AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा साक्षात काळच, साप पुन्हा आयुष्यात घराचा उंबरा ओलांडणार नाही, आदिवासी लोकांची मास्टर ट्रीक

अलीकडच्या काळात काही विशिष्ट प्रजातींच्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या सापांना न मारता आपण काही नैसर्गिक उपायांनी त्यांना आपल्या घरापासून दूर ठेवू शकतो, ग्रामीण भागांमध्ये हे उपाय आजही केले जातात.

हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा साक्षात काळच, साप पुन्हा आयुष्यात घराचा उंबरा ओलांडणार नाही, आदिवासी लोकांची मास्टर ट्रीक
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 8:53 PM
Share

अलीकडच्या काळात विशिष्ट प्रजातींच्या सापांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुमच्या परिसरात, आजूबाजुला तसेच घरात देखील हे साप अनेकदा आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त घोणस प्रजातीचे साप आढळून येतात. या सापांचं वैशिष्ट म्हणजे हे साप एकाच वेळी वीस ते तीस पिल्लांना जन्म देतात. तसेच त्यांचा मृत्यदर देखील कमी आहे. त्यामुळे या सापांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे, विशेष: उसाची शेतं, घराजवळ असलेली बाग, सोसायटी अशा कोणत्याही ठिकाणी हा साप सहज आढळून येतो. तसेच तुमच्या घरात जेवढे काही साप आढळू येतात, त्यापैकी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के साप हे घोणस याच प्रजातीचे साप असतात. हा अत्यंत विषारी साप असतो.

तर दुसरीकडे एक विरुद्ध चित्र देखील पहायला मिळतं, ते म्हणजे अनेकांच्या मनात असा गैरसमज असतो की जो साप आपल्याला दिसतो, तो प्रत्येक साप हा विषारीच असतो. परंतु तसं काही नसतं, अनेक साप हे बिनविषारी देखील असतात. असे साप आपण मारतो, त्यामुळे अलिकडच्या काळात सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या भारतामधून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान अशा दोन्ही स्थिती निर्माण होऊ नयेत, साप घरात येऊ नयेत, यासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये काही पारंपरीक उपाय केले जातात. ज्यामुळे सापाला घरापासून दूर ठेवण्यास मदत होते.

अशा काही वनस्पती असतात, ज्यामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या वनस्पतींपासून दूर राहतो.  त्यातीलच एक वनस्पती आहे, ती म्हणजे मोहाची फुलं, मोहाच्या फुलांना एक विशिष्ट वास असतो, या वासामुळे साप या झाडाच्या जवळ येत नाहीत. अनेक जण या झाडाच्या फुलांपासून रस तयार करतात. हा द्रव पदार्थ जिथून -जिथून साप घरात येण्याची शक्यता असते, तिथे तो शिंपडला जातो. या फुलांच्या तीव्र वासामुळे साप त्या परिसरात येत नाही. अनेकजण या मोहांच्या फुलांपासून जो रस तयार केला जातो, त्या रसाची एक छोटीशी बाटलीच आपल्या खिशामध्ये ठेवतात, असंही म्हटलं जातं.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप