हा वेल रात्रीच्या वेळी बनतो सापांचा अड्डा, परिसरात साप दिसतातच, कधीही घरात लावण्याची चूक करू नका
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, मात्र यापैकी अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. सापांच्या इतर प्रजातीपासून मानवाला तसा काही फार धोका नाही. शक्यतो साप अशाच जागी आढळून येतात, जिथे त्यांना वातावरण अनुकूल असेल.

भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आहे, भारतामध्ये असंख्य प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सरपटणारे प्राणी आढळून येतात. हत्ती सारख्या विशाल प्राण्यांपासून ते अगदी छोट्या-छोट्या किटकांपर्यंत भारतामध्ये प्राण्यांच्या हजारो प्राजीत आढळून येतात. साप हा देखील या निसर्गाचा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सापांचं मुख्य अन्न हे घुस असल्यामुळे पिकांची नासाडी कमी होण्यास मदत होते. सापांना शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. यातील अगदी मोजक्याच हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्राजातीचे साप हे विषारी आहे.
मात्र दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो, या गैरसमजामधून आपण प्रत्येक सापाला मारतो, परंतु ही चूक करू नका, कारण यामुळे आज देशातून अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना सुरक्षित अधिवासामध्ये सोडतील.
अशी काही झाड आहेत, या झाडांच्या आजाबाजुला नैसर्गिकरित्याच सापांच्या निवाऱ्यासाठी अनुकूल अशी परिसंस्था बनते. अनुकूल वातावरण निर्माण होतं. सापांना नेहमी जिथे आर्द्रतायुक्त वातावरण आहे, अशा जागा निवाऱ्यासाठी आरामदायी वाटतात. त्यामुळे साप नेहमी अशा जागांवर आढळून येतात. अशा जागा आपल्या घरात तयार न होऊ देणं, घर नेहमी स्वच्छ ठेवणं हा सापांपासून बचावा सर्वात सोपा उपाय आहे.
अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे नागिनीच्या पानाचा वेल, ज्याला आपण विड्याचे पान असं देखील म्हणतो, या नवस्पतीच्या वाढीसाठी खूप जास्त पाण्याची आवशक्यता असते. त्यामुळे या झाडाच्या आसपास सदैव ओलावा असतो. तसेच या ओलाव्यामुळे अनेक किटकं आणि कधी-कधी बेडूक देखील या झाडाकडे आकर्षित होतात. या झाडाच्या परिसरात आर्द्रता जास्त असल्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो. तसेच या झाडाच्या परिसरात त्याला त्याची शिकार देखील सहज सापडते, त्यामुळे अनेकदा साप अशा झाडांच्या परिसरात आढळून येतात. जर तुम्ही पानाचा वेल लावलाच असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे, तो परिसर कायम स्वच्छ ठेवावा.