17 बंडखोर खासदारांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक; मुस्लिम खासदारांच्या भूमिकेने ट्विस्ट, राजकारणात पुन्हा उलथापालथ
पश्चिम बंगालमधील 17 बंडखोर खासदारांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. मुस्लिम खासदारांच्या भूमिकेने ट्विस्ट निर्माण झाला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या

पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ झाली आहे. तृणमूल काँग्रेसची साथ सोडलेले, बंडखोर खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केलेल्या एका दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी नॅशनल सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षात सामील झालेले 17 खासदार लवकरच भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याचे म्हटलं आहे. परंतु काही नेत्यांनी डावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
बासुनिया यांच्या दाव्यानुसार, 17 खासदारांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे. दूर्गा पूजा झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो. टीएमसमधील बंडखोर खासदारांनी NCPI पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पक्षाने एनडीएला पाठिंबा दिला होता. परंतु बंडखोर खासदार अबू ताहेर खान यांनी बासुनिया यांच्या दाव्यावर नाराजी दर्शवली आहे. बासुनिया यांना 17 खासदारांची बाजू मांडण्याचा कोणताही अधिकार नाही. खान यांनी पुढे म्हटलं की, आम्ही भाजपमध्ये जाणार नाही. आम्ही एनडीएमध्ये जाणार नाही. यावेळी खासदार खलीलूर रहमान आणि युसूफ पठाण यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तिघांनी एनडीएला बाहेर पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे.
आम्ही तिघे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे खान यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांना विकासाच्या मुद्द्यांवर आयोजित बैठकांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बासुनिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित असलेल्या नेत्यांचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यात सायोनी घोष यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी बंडखोरी केली. त्यातील 3 खासदारांनी बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपमध्ये न जाण्याचेही ठरवले आहे. बंडखोरांनी पक्ष बदलल्यास घोष देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा बासुनिया यांनी केला आहे.
तत्पूर्वी, भाजपने सध्या कोणत्याही पक्षाला विलीन करण्यास नकार दर्शवला आहे. भाजप प्रवक्ते देबजीत यांनी म्हटलं की, माझ्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपीआय सध्या भाजपमध्ये विलीन होणार नाहीत. तृणमूल काँग्रेसच्या काळात याच पक्षातील नेते आणि खासदारांनी कशा प्रकारे अत्याचार केला, हे राज्यातील लोक विसरलेले नाहीत’.