AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, UPI व्यवहार आता मोफत नाही, 2 हजारांपेक्षा जास्तच्या व्यवहारावर लागणार शुल्क, थेट..

2 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारावर शुल्क लागणार आहे. हा मोठा निर्णय घेण्यात आला. हा एकप्रकारचा दणका असणार आहे. शुल्क आकारणी दुकानदारांवर केली जाईल, असे केंद्राच्या अधिसूचनेत स्पष्ट म्हटले आहे. मात्र, आता दोन हजारांपेक्षा जास्त व्यवहारावर दुकानदार UPI करण्यास विरोध करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, UPI व्यवहार आता मोफत नाही, 2 हजारांपेक्षा जास्तच्या व्यवहारावर लागणार शुल्क, थेट..
UPI transactions
| Updated on: Sep 15, 2026 | 9:13 AM
Share

2 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारावर शुल्क लागणार आहे. शुल्क आकारणी दुकानदारांवर केली जाईल, असे केंद्राच्या अधिसूचनेत स्पष्ट म्हटले आहे. मात्र, यामुळे आता UPI व्यवहाराला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन शुल्क ठरवणार आहे. दोन हजारांपुढील व्यवहारासाठी अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. रोख पैशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सुरू असलेले UPI व्यवहार आता पूर्णपणे मोफत राहणार नाहीत. इतके दिवस हे व्यवहार मोफत होते. त्यामुळे प्रत्येकजण UPI करण्यावर भर देत होता. मात्र, आता यावर शुल्क लागणार आहे. कारण 2 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारावर आता शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झालाय.

केंद्र सरकारने काल रात्री याबाबत अधिसूचना जारी करत शुल्क आकारणी करण्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामुळे मोठा धक्का लोकांना बसलाय. 2 हजारपर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाही. 2 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारावर शुल्क लागणार आहे. अगोदर कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नव्हते. आता मात्र शुल्क लागणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन किती रकमेवर किती शुल्क लावायचं ते ठरवणार आहे. यूपीआय व्यवहाराचे शुल्क दुकानदारांकडूनच वसूल केलं जाणार आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयने 2 हजारांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तरी शुल्क लागणार नाही. भारतात तयार झालेल्या यूपीआयने सिस्टिमने आर्थिक व्यवहारांमध्ये डिजिटल क्रांती घडवली.

त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी हे तंत्रज्ञान स्वीकारण्यास तयारी दर्शवलीये. याआधी सर्व व्यवहार मोफत असलेल्या यूपीआयवर आता शुल्क लागणार असल्यानं काहीशी निराशा होणार हे मात्र नक्की आहे. शुल्क आकारणीत अडचणी काय? शुल्क आकारणीमुळे दुकानदार यूपीआयवर 2 हजारांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यास तयार होतील का?

रोख रकमेतच खरेदी करा, अशी मागणी दुकानदार ग्राहकांकडे करण्याची शक्यता अधिक काही दुकानदार अतिरिक्त शुल्काची मागणी थेट ग्राहकाकडूनच करू शकतात. नव्या नियमांमुळे 2 हजारांपेक्षा अधिकचे यूपीआय व्यवहार करताना वाद निर्माण होण्याची शक्यता शुल्क आकारणीमुळे पुन्हा रोखीचे व्यवहार वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती