AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याला थेट अटक; भाजपाचे सरकार येताच ED ची मोठी कारवाई!

TMC Leader Arrested : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली आहे. नगरपालिका भरती घोटाळा प्रकरणात ईडीने टीएमसीच्या एका बड्या नेत्याला अटक केली आहे.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याला थेट अटक; भाजपाचे सरकार येताच ED ची मोठी कारवाई!
Bose ArrestedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 10:32 PM
Share

दोन दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे, सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत. बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली आहे. नगरपालिका भरती घोटाळा प्रकरणात ईडीने टीएमसीचे नेते सुजीत बोस यांना अटक केली आहे. अनेक तासांच्या कसून चौकशीनंतर त्यांना साल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील ईडी कार्यालयात अटक करण्यात आली. आता ईडी आगामी काळात भरती घोटाळ्यातील पैशांच्या व्यवहारांची, मालमत्तांची आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भरती करण्याच्या बदल्यात अनेक फ्लॅट घेतल्याचा आरोप

टीएमसीचे नेते आणि माजी मंत्री सुजीत बोस यांनी एखाद्या तरुणाला भरती केल्याच्या बदल्यात मिळालेल्या पैशांतून अनेक फ्लॅट खरेदी केले असल्याचा आरोप आहे. ईडीने या मालमत्तांना थेट गुन्ह्यातून मिळालेली संपत्ती मानले आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाल्याचे पुरावेही ईडीला मिळाले आहेत. त्यामुळे आता बोस यांना अटक करण्यात आली आहे.

निवडणुकीदरम्यान ईडीकडून अनेक नोटिसा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळा सुजीत बोस यांना ईडीकडून अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक नोटीस 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारातील व्यस्ततेचा हवाला देत इडीसमोर हजर राहण्यासाठी सूट मिळावी यासाठी कोलकाता हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर 1 मे रोजी बोस ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.

200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

ईडीने याआधी या कथित घोटाळ्याच्या संदर्भात बोस आणि त्यांच्या मुलाच्या मालकीच्या ठिकाणी दोन वेळा छापेमारी केली होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यांदरम्यान या प्रकरणात सहभाग असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली. हा घोटाळा बंगालमधील विविध नगरपालिकांमध्ये 1800 हून अधिक लोकांची बेकायदेशीर भरती केल्याचा असून, यात सुमारे 200 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?