AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : आज केजरीवाल PM मोदींच्या निवासस्थानी धडकण्याच्या तयारीत, पण त्याआधीच दिल्ली पोलिसांनी दिला झटका

Arvind Kejriwal : भाजपने अरविंद केजरीवालांच्या या आंदोलनावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यात देशातील 1 नंबरचा अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा लागली आहे अशी टीका भाजपने केली.

Arvind Kejriwal : आज केजरीवाल PM मोदींच्या निवासस्थानी धडकण्याच्या तयारीत, पण त्याआधीच दिल्ली पोलिसांनी दिला झटका
Arvind Kejriwal
| Updated on: Aug 04, 2026 | 8:19 AM
Share

देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्यावरुन काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल असंच करण्याच्या तयारीत आहेत. ते पीएम निवासस्थानापर्यंत मार्च काढणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज 4 ऑगस्टला दुपारी 12 च्या सुमारास ते पीएम निवासस्थानापर्यंत मार्च काढणार आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे E20 पेट्रोल विरोधात प्रदर्शन करणार आहेत. ते आपल्यासोबत 100 लोकांना घेऊन जाणार आहेत. त्यानंतर ते जनहित याचिका सोपवतील.

भारताने अमेरिकेकडून इथेनॉल खरेदीसाठी ट्रम्प समोर गुडघे टेकले आहेत असा केजरीवाल यांचा आरोप आहे. सरकार दबावाखाली E20 पेट्रोलला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सरकारकडून सातत्याने E20 पेट्रोलच्या वापरावर भर दिला जातोय, त्यातून काहीतरी छुपा अजेंडा दिसून येतोय. लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. केजरीवाल यांना मार्चची परवानगी दिली जाणार नाही असं दिल्ली पोलीस दलातील सूत्रांनी सांगितलं. असा कुठलाही मार्च रोखण्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

केजरीवालांच्या मागण्या काय?

“मागच्या महिन्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. E20 पेट्रोलशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. पण मला त्या पत्रावर काहीच उत्तर मिळालं नाही. आता मी स्वत: पीएम निवासस्थानी जाऊन जनतेने स्वाक्षरी केलेले अर्ज सोपवणार आहे” असं केजरीवाल म्हणाले. “पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल असे दोन्ही पर्याय मिळाले पाहिजेत. E20 पेट्रोलची किंमत अजून कमी करा” अशी मागणी त्यांनी केली.

अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा

दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी केजरीवालांच्या या आंदोलनावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यात देशातील 1 नंबरचा अराजकतावादी कोण, बनण्याची स्पर्धा लागली आहे अशी टीका मल्होत्रा यांनी केली. “काँग्रेसने जेव्हापासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, तेव्हापासून केजरीवाल यांना आपण मागे पडल्यासारखं वाटत आहे. विनापरवानगी धरणं, प्रदर्शन करणं आणि नंतर विक्टिम कार्ड खेळणं ही केजरीवालाची जुनी शैली आहे” अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं