
नवी दिल्ली,17 ऑक्टोबर 2025: भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित आदिकर्मयोगी अभियानावरील राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून सहभाग घेतला. आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशातील 30 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. त्यामुळे समावेशक सहभाग आणि जबाबदार प्रशासन या भारताच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली,
आदिकर्मयोगी अभियानावरील आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या आदिवासी सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण अभियान (पीएम-जनमन), आदिकर्मायोगी अभियान आणि धरती आबा जन भागिदारी अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या कार्यक्रमातील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की, आदिकर्मायोगी अभियान हे प्रत्येक आदिवासी घराला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा एक अद्वितीय आणि क्रांतिकारी प्रयत्न आहे. तळागाळात आदिवासी नेतृत्वाचे सशक्तीकरण करणे हा 2047 मध्ये विकसित भारताच्या स्वप्नाचा पाया आहे असं म्हणत त्यांनी या अभियानात सहभागी असलेल्या कर्मयोगींचे समर्पण, सेवा आणि सहभागाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी म्हटले की, ‘या अभियानाने आतापर्यंत 20 लाखांहून अधिक अधिकारी, स्वयंसहाय्यता गटातील महिला आणि आदिवासी तरुणांना प्रशिक्षित केले आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे आदिवासी नेतृत्व अभियान बनले आहे. याबाबत बोलताना राज्यमंत्री श्री दुर्गादास उईके म्हणाले की, ‘हे अभियान आता समुदाय-नेतृत्वाखालील बदलाच्या देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाले आहे.
देशभरातून 1200 हून अधिक लोकांची परिषदेला उपस्थिती
या कार्यक्रमात खाली पाच प्रमुख विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली होती
या सत्रांमध्ये राज्यनिहाय समन्वय धोरणे आणि ग्राम कृती योजना यावर चर्चा झाली.
देश लोकांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे
शासन आणि संस्थात्मक बळकटीकरण
उपजीविका आणि उद्योजकता
शिक्षण आणि कौशल्य विकास
आरोग्य आणि पोषण
पायाभूत सुविधा
या परिषदेदरम्यान, 12 नोव्हेंबर 2025 रोजी आदिवासी व्यवसाय शिखर परिषद आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परिषद आदिवासी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक बाजारपेठेत समन्वय निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल.
ही राष्ट्रीय परिषद आदिवासी समुदायांना प्रशासन, सामूहिक सहभाग आणि जबाबदारीवर आधारित विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंत्रालयाच्या दृढ निश्चय दर्शविते आणि गावापासून राष्ट्रापर्यंत आदि कर्मयोगीची भावना विकसित आणि समावेशक भारताच्या मार्गावर प्रकाश टाकते.