AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही 9 इराणमध्ये दाखल, सुमैरा खान यांचा युद्धभूमीतून ग्राउंड रिपोर्ट

TV9 'भारतवर्ष'च्या पत्रकार सुमैरा खान या इराणची राजधानी तेहरानला जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत. याचसोबत TV9 नेटवर्क हे तेहरानला जाऊन रिपोर्टिंग करणारं भारतातील पहिलं न्यूज चॅनल बनलं आहे.

टीव्ही 9 इराणमध्ये दाखल, सुमैरा खान यांचा युद्धभूमीतून ग्राउंड रिपोर्ट
Sumaira KhanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 8:38 PM
Share

TV9 ‘भारतवर्ष’च्या पत्रकार सुमैरा खान या इराणची राजधानी तेहरानला जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत. याचसोबत TV9 नेटवर्क हे तेहरानला जाऊन रिपोर्टिंग करणारं भारतातील पहिलं न्यूज चॅनल बनलं आहे. सुमैरा खान या सध्या तेहरानमध्ये फ्रीडम स्क्वायरच्या परिसरात रिपोर्टिंग करत आहेत. इथून त्या इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, याचे अपडेट्स टीव्ही 9 च्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. सुमैरा खान यांनी अमेरिका आणि इस्त्रायलसोबतच्या युद्धात इराणनंच किती नुकसान झालं आहे? याची काही छायाचित्र दाखवली आहेत. सुमैरा खान यांचा तेहरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. त्या विमानाने आधी इराकला पोहोचल्या, त्यानंतर त्या वाहानाने इराकवरून प्रवासाचा मोठा पल्ला पार करत इराणला पोहोचल्या. या प्रवासात त्यांना काही अतंर हे पायी देखील चालावं लागलं, मात्र प्रवासात एवढे अडथळे आले, तरी देखील त्यांनी इराण गाठलं.

इराणला पोहोचल्यानंतर सुमैरा यांनी सांगितलं की सध्या त्या जिथून रिपोर्टिंग करत आहेत, तो इराणचा इंक्लाब स्ट्रीट आहे, जो की इराणमधील सर्वात महत्त्वाचा स्ट्रीट समजला जातो. हा तोच परिसर आहे, ज्या परिसरात इस्त्रायल आणि अमेरिकेकडून जोरदार बॉम्ब वर्षाव करण्यात आला होता. मात्र या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा इराण अधिक गतीने पूर्वपदावर येत आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं होतं. येथील महत्त्वाच्या इमारती, हॉस्पिटल आणि हॉटेलचे काच तुटले होते, मोड-तोड झाली होती. ते सर्व आता दुरूस्त करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती सुमैरा यांनी दिली आहे.

सुमैरा यांनी इराणमध्ये जनजीवन सध्या कसं सुरू आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. इराणमध्ये आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. मात्र युद्धापूर्वी जसं वातावरण इराणमध्ये होतं, तसंच वातावरण सध्या पहायला मिळत आहे, असं सुमैरा यांनी म्हटलं आहे, तसेच यावेळी त्यांनी इंक्लाब स्ट्रीटवर असलेला इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई यांचा एक मोठा फोटो देखील दाखवला. हा फोटो दाखवताना त्या म्हणाल्या की इराणमध्ये या फोटोचं खूप महत्त्व आहे, कारण या फोटोमुळेच इराणमधील जनतेला एकजूट होण्याची प्रेरणा मिळाली, अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले