
दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये अत्यंत उत्साहात आणि धूमधडाक्यात ‘टीव्ही 9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा आज चौथा दिवस आहे. मेळ्याच्या चौथ्या दिवशी आणि शारदीय नवरात्रीच्या नवमीनिमित्त देवी सिद्धिदात्रीची विधीवत पूजा-अर्चना आणि मंत्रोच्चाराचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये 28 सप्टेंबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दसऱ्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. आज 1 ऑक्टोबर रोजी कोणकोणते खास कार्यक्रम होणार आहेत, ते जाणून घेऊयात..
बुधवारी महानवमीनिमित्त ‘टीव्ही 9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’च्या चौथ्या दिवसाला अविस्मरणीय आणि शानदार बनवण्यासाठी सर्वांत आधी सकाळी 10 वाजता नवमी पूजा करण्यात आली. त्यानंतर 11.30 वाजता नैवेद्य अर्पण केलं जाईल. दुपारी 12.30 वाजता पुष्पांजली आणि हवनचं आयोजन करण्यात आलं आहे. हवन आणि पुष्पांजलीने पंडाल एका अनोख्या सकारात्मकतेनं भरून जाईल. तुम्हालाही ही संधी गमवायची नसेल, तर तुम्ही लवकरच त्यात सहभागी होऊ शकता. काही कारणास्तव तुम्ही जर सकाळी या पूजेला उपस्थित राहू शकत नसाल, तर रात्री 8 वाजता संध्याकाळची आरती केली जाईल. तेव्हा तुम्ही देवीचा आशीर्वाद घेऊ शकता आणि आरतीत सहभागी होऊ शकता.
‘चांद सिफारिश’, ‘दस बहाने’ आणि ‘हे शोना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला गायक शान आज ”टीव्ही 9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये सहभागी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता शानचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं आहे. या लाइव्ह कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये जाऊ शकता.
दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची आरती आणि नामजप करण्यात आला. तिसऱ्या दिवशी केंद्री मंत्री सीआर पाटील, उत्तर प्रदेशचे मंत्री सुनील कुमार शर्मा आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
उत्तर प्रदेशचे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री सुनील कुमार शर्मा हेसुद्धा ‘टीव्ही 9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ला उपस्थित होते आणि त्यांनी देवी दुर्गाची पूजा केली. यावेळी ते म्हणाले, “हा अत्यंत भव्य कार्यक्रम आहे. पंडालमध्ये साक्षात देवी दुर्गासमोर बसल्यासारखं मला वाटलं. अत्यंत सकारात्मक वातावरणात पूजा करण्याचा अनुभव आला.” तर काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, “टीव्ही 9 च्या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला देवीच्या दरबारात जाण्याची संधी मिळाली. इथे येऊन खूप छान वाटलं.