AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौदा वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागलं, घरच्यांनी डॉक्टरकडे नेले; तपासणीत जे दिसले ते पाहून सर्वच हैराण झाले !

एका 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागले. काही दिवसांपासून तिला उलटीचाही त्रास जाणवू लागला. आई-वडिल तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता जे समोर दिसलं ते पाहून सर्वच हादरले.

चौदा वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागलं, घरच्यांनी डॉक्टरकडे नेले; तपासणीत जे दिसले ते पाहून सर्वच हैराण झाले !
उत्तर प्रदेशात 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात केसांचा गोळा आढळलाImage Credit source: google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 31, 2023 | 3:03 PM
Share

बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. एका 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखू लागले. आई-वडिल तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता पोटात जे दिसले ते पाहून घरच्यांसह डॉक्टरही हैराण झाले. मुलीच्या पोटात केसांचा गुच्छ आढळून आला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन दोन किलोहून अधिक केसांचा गुच्छ पोटातून काढला. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलीला लहानपणापासूनच केस खाण्याची सवय होत.

अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यशस्वी शस्त्रक्रिया

अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर डॉक्टरांच्या टीमने मुलीच्या पोटातील 2 किलोहून अधिक केस काढून यशस्वी ऑपरेशन केले. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता मुलीची प्रकृती स्थिर असून, सध्या मुलीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

मुलीला केस खाण्याची सवय होती

बिजनौर शहरात राहणाऱ्या या 14 वर्षीय निष्पाप मुलीला गेल्या अनेक वर्षांपासून गुपचूप केस खाण्याची सवय होती. यामुळे मुलीच्या पोटात केसांचा मोठा गुच्छ जमा झाला. यामुळे मुलीला पोटदुखी आणि उलट्या होण्याच्या तक्रारी सुरू झाल्या. काहीही खाल्ले की उलट्या व्हायच्या. त्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली.

मुलीचे वडिल तिला प्रकाश हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे डॉ. प्रकाश यांनी पोटाचा अल्ट्रासाऊंड केला असता त्यात केसांची गुच्छ दिसला. डॉक्टर प्रकाश यांनी पोटावरील शस्त्रक्रियेद्वारे पोटातील सुमारे अडीच किलो केसांचा गुच्छ काढला आहे. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!