जगातील मोठा मुस्लीम देश PoK ला समजतो भारताचा भाग, G 20 बैठकीत व्हिडिओ केला होता शेअर
G 20 बैठकीत इंडिया-मिडिल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोरचा व्हिडिओ यूएईने शेअर केला. त्याच्या नकाशात पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भाग दाखवला. संयुक्त अरब अमिरातमध्ये अनेक प्रसंगी पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भाग असल्याचे यूएईने म्हटले आहे.

UAE Considers PoK As Indian Territory: पहलगाव हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहे. भारताकडून पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट केली जाऊ शकतात. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आमचा असल्याचा दावा नेहमी केला आहे. भारताच्या या दाव्यास जगतील अनेक देशांचा पाठिंबा आहे. त्यात जगातील मोठा मुस्लीम देश असलेल्या संयुक्त अरब अमिरातचाही (यूएई) समावेश आहे. अनेक प्रसंगी संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा असल्याचा दावा केला आहे.
1947 मध्ये पाकिस्तानने कश्मीरमधील काही भागावर ताबा मिळवला होता. त्याला आज पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके म्हटले जाते. पाकिस्तान त्याला आझाद काश्मीर म्हणतो. भारत काश्मीरच्या या भागाला स्वतःचा मानतो. भारताच्या दाव्यास यूएईकडून नेहमी समर्थन मिळाले आहे. अनेक प्रसंगांवर यूएईने जाहीरपणे पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भूभाग असल्याचे म्हटले आहे. मागील G 20 बैठकीत इंडिया-मिडिल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोरचा व्हिडिओ यूएईने शेअर केला. त्याच्या नकाशात पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भाग दाखवला. संयुक्त अरब अमिरातमध्ये अनेक प्रसंगी पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भाग असल्याचे यूएईने म्हटले आहे.
सन 2019 मध्ये भारत सरकारने कश्मीरमधील कलम 370 रद्द केले. त्यावेळी जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या होत्या. यूएईने हा प्रकार भारताचा अंतर्गत प्रकार असल्याचा म्हटले. यूएईकडून काश्मीरबाबत नेहमी वक्तव्य करण्याचे टाळले जाते. दुसरीकडे यूएईचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहे.
सौदी अरेबिया, युएई, इंडोनेशिया आणि इजिप्तसारखे देश दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका केवळ योग्य मानत नाहीत तर जागतिक सुरक्षेसाठी ती आवश्यक देखील मानतात. या देशांचा पाठिंबा केवळ राजनैतिक बाबींशीच नाही तर धोरणात्मक आणि आर्थिक हितसंबंधांशी देखील जोडलेला आहे. यामुळे हे देश भारतासोबत असणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिस्तानविरोधात जनमत तयार केले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांनी प्रोत्साहन देत असल्याचा भारताचा दावा अनेक देशांनी मान्य केला आहे.
