Uddhav Thackeray:राजकारणाचे डावपेच चालत राहतील, जनतेची कामे थांबवू नका, थेट माझ्याकडे आणा, सत्तानाट्यातही मुख्यमंत्री सक्रिय, अधिकाऱ्यांना आदेश

जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती थेट तातडीने आपल्याकडे घेऊन यावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिलेत.

Uddhav Thackeray:राजकारणाचे डावपेच चालत राहतील, जनतेची कामे थांबवू नका, थेट माझ्याकडे आणा,  सत्तानाट्यातही मुख्यमंत्री सक्रिय, अधिकाऱ्यांना आदेश
CM meeting in political crisis
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 7:07 PM

मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांचे एक खंबीर रुप जनतेला पाहायला मिळतं आहे. गेल्या दोन तीन दिवसांत राजकीय डावपेच सुरु असले तरी राज्य कारभार थांबला आहे, असो होता कामा नये, असे निर्देश त्यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना (meeting with officers)दिले आहेत. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती थेट तातडीने आपल्याकडे घेऊन यावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिलेत.

राज्याच्या स्थितीचा घेतला आढावा

राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.

पाऊस आणि वारीची घेतली माहिती

राज्यातील कोरोनाची स्थिती, त्याबाबतच्या उपाययोजना याची त्यांनी माहिती घएतली तसेच मान्सून राज्यात कुठे बरसतो आहे. तसेच पेरण्या, खतांची उपलब्धता याचाही आढावा त्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या.

तब्येत बरी नसतानाही दिवसभरात तीन बैठका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभरात तीन बैठका घेतल्या आहे. त्यांनी काल संध्याकाळी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली होती. त्यानंतर आज दुपारी त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली, त्यात त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना पुढच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. नंतर दुपारी त्यांनी राज्यातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि राज्यातील सध्याची स्थिती जामून घेतली. राजकीय वातावरण तापलेले असले तरी राज्याचा राज्य कारभार सुरळीत सुरु राहिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर संध्याकाळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.