
UGC च्या नवीन नियमांविरोधात दाखल याचिकांवर आज (२९ जानेवारी २०२६) सर्वोच्च न्यायालायात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान CJI सूर्यकांत यांनी अनेक महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या असून यूजीसीच्या नव्या नियमांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणी आता 19 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, यूजीसीच्या नव्या नियमांना देशभरातून विरोध होत असल्याने या नव्या नियमांत नेमके काय आहे? या नियमांना विरोध का होत आहे? सोबतच याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय आहे? या सर्व बाबी जाणून घेऊ या…. यूजीसीच्या कोणत्या नियमांवर वाद होतोय? गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यालये तसेच विद्यापीठांत होणाऱ्या जातीआधारित भेदवाला...