Ujjain Hanuman Mandir: खडे हनुमान एक इंचही का नाही हलले? पुजार्‍याचा मोठा गौप्यस्फोट, मूर्ती हटवणार की नाही?

Ujjain Khade Hanuman: मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील खडे हनुमानाने सध्या प्रशासनासमोर मोठे आव्हान उभं केलं आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ही मूर्ती हटवण्यात येणार आहे. पण ही मूर्ती काही हटेना. आता पुजाऱ्याने एक मोठा खुलासा केला आहे.

Ujjain Hanuman Mandir: खडे हनुमान एक इंचही का नाही हलले? पुजार्‍याचा मोठा गौप्यस्फोट, मूर्ती हटवणार की नाही?
खडे हनुमान एक इंचही का नाही हलले?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 1:38 PM

मध्य प्रदेशची धार्मिक नगरी उज्जैन येथील सिंहस्थ 2028 (Simhastha 2028) ची तयारी जोरात सुरू आहे. रस्त्याच्या रूंदीकरणाचे आणि विकासाचे काम गतीने सुरू आहे. एका मुख्य रस्त्याच्या मधोमध खडे हनुमान मंदिर होते. ते हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रशासनाने मंदिर पाडले. पण हनुमानाची मूर्ती काही जागची हलेना. आधुनिक तंत्रज्ञान, अभियंते भिडले. पण त्यांना एक इंचही मूर्ती हटवता आली नाही. ही वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली. सोशल मीडियावर हे बजरंगबली व्हायरल झाले. त्यानंतर प्रशासनाने क्षमा याचना केली. पोलिसांचे बँडपथकाने सलामी दिली. आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले -पुजारी महेश बैरागी

रुग्णालयातून उपचार घेऊन आलेले मंदिराचे मुख्य पुजारी महेश बैरागी यांनी सांगितले की, मंदिर हटवण्याचे आणि मूर्ती स्थलांतरणाचे काम अगदी सहज झाले असते. पण प्रशासनाने नाहक हट्ट केला. यामुळे आता प्रश्न बिकट झाला. हे मंदिर हटवण्यासाठी मी सहमती दर्शवली होती. पण अट सुद्धा घातली होती. प्रशासनाने माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाने हे मंदिर हटवण्यात मोठी घाई केली. त्याचा परिणाम त्यांना दिसून आला. प्रशासनाने मोठे खादकाम केलेले नाही. पण त्यांना चमत्कार दिसला असा खुलासा पुजाऱ्याने केला आहे. त्यांच्या मते, जर त्यांनी बजरंगबलीची माफी मागितली आणि त्यांना विनंती केली तर कदाचित दुसरा चमत्कार दिसून येऊ शकतो.

खडे हनुमान डेस्टिनेशन पाईंट

मुख्य पुजारी महेश बैरागी यांच्या मते आता हे प्रकरण केवळ एका मंदिरापूरतं मर्यादित राहिलेलं नाही. देशातील लाखो पुजारी, भाविक, भक्त यांच्या भावनेचा हा मुद्दा झाला आहे. सोशल मीडियामुळे हे प्रकरण देशभरात वाऱ्यासारखं पसरलं आहे. आता रस्ता दुसरीकडून करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे. मंदिर वाचवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन सुद्धा दोन पावलं मागं आलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावर खडे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक जण इथे येऊन दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असल्याने आता शहरातील हे नवीन डेस्टिनेशन पाईंट ठरले आहे. भगवान महाकालचे दर्शन घेऊन भाविक तडक खडे हनुमानाच्या दर्शनासाठी येत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us