
हैदराबादः तेलंगणामध्ये काही लोकांनी आंदोलन केले आहे, ते विचित्र प्रकारचे आंदोलन केल्यामुळे सध्या तेलंगणातील (Telangana) राजकारणावर जोरदार टीका होत आहे. मुनुगोडे (munugode) येथे काही लोकांनी कबर खोदून त्याठिकाणी प्रतिकात्मक असा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा फोटो लावण्यात आला आहे. नलगोंडा जिल्ह्यातील चौतूप्पल, मुनुगोडे येथे संशोधन केंद्र अद्याप स्थापन झाले नाही.
त्यामुळे या केंद्राच्या बांधकामाला होत असलेल्या दिरंगाईबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
त्यावेळी हे विचित्र प्रकारचे आंदोलन केले गेले आहे. मुनुगोडे विधानसभा जागेवर पोटनिवडणूक होत असून या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे.
मुनुगोडेच्या चौतुप्पल परिसरात आरएफएमआरसीची स्थापना करण्याचा प्रस्ताव केला गेला होता. त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची गती घेतली नसल्यामुळे टीका करण्यात आली आहे.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यांनी फ्लोराईडग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षांवर निशाणा साधत त्यांची प्रतिकात्मक कबर खोदण्यात आली आहे.
टीआरएसचे सोशल मीडिया समन्वयक वाय. सतीश रेड्डी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, जे. पी. नड्डा यांनी 2016 मध्ये याबाबत वचन दिले होते.
या ठिकाणी 300 खाटांचे रुग्णालय, चौथुप्पल येथे फ्लोराईड संशोधन केंद्र आणि फ्लोराईड पीडितांना विशेष मदत करणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्याबाबत पुढे काय प्रगती झाली असा सवालही करण्यात आला आहे.
तेलंगणाचे मंत्री आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामा राव यांनीही हे ट्विट शेअर केले आणि ते भाजप आणि नड्डा यांच्यावर जोरदाट टीका केली आहे.
स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया याबद्दल प्रतिक्रिया देताना या प्रकाराबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. तर भाजप नेते एन. व्ही. सुभाष यांनीही कबरीवर जे.पी. नड्डा यांचा फोटो लावणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. आम्ही याचा निषेध करत असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस तक्रारही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवत भारतीय राजकारणातील वाईट पद्धतीची घसरण असल्याचे म्हटले आहे.