AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 Live Streaming : मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प Live बघा, A टू Z माहिती मिळणार

एनडीए सरकार आज म्हणजेच मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प कुठे आणि कधी असणार? तुम्हाला कुठे पाहता येणार जाणून घ्या. अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट साध्या आणि सोप्या शब्दात आमच्या अधिकृत वेबसाईट आणि चॅनलवर पाहू शकता.

Budget 2024 Live Streaming : मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प Live बघा, A टू Z माहिती मिळणार
| Edited By: | Updated on: Jul 23, 2024 | 8:12 AM
Share

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज म्हणजेच मंगळवार 23 जुलै 2024 ला संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते बडे उद्योजकांसह लक्ष लागलेलं असणार आहे. मोदी 3.0 सरकार आणि NDA सरकारच्याय अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होतात याची सर्वांना उत्सुकता आहे. याआधी काही वर्षे अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला सादर केला जात आहे. मात्र यंदा निवडणुक असल्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला गेला होता. यंदाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

तुम्ही आज अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहू शकता. याशिवाय तुम्ही डीडी नॅशनलवर थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. तुम्हाला तुमच्या फोनवर लाईव्ह टेलिकास्ट पहायचे असेल, तर तुम्ही ते डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता.

  • संसद टीव्ही
  • दूरदर्शन प्रसारण
  • संसद टीव्ही आणि दूरदर्शनचे YouTube चॅनल थेट प्रवाह
  • वित्त मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट थेट प्रवाह
  • बजेट 2024 तारीख आणि वेळ
  • Tv9 मराठीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर तुम्ही टीव्ही लाईव्ह पाहू शकता.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणांचे सर्व तपशील सरकारद्वारे अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुम्ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बजेट दस्तऐवज पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.

स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्याचा निर्णय

मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करायला सुरूवात  केली. स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्यात आले. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्याची पंरपरा संपुष्टात आणण्याची सूचना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.