125 चे पेट्रोल 95 पेक्षाही कमी, E20 वर मोदी सरकारचा अत्यंत मोठा दावा..
E20 पेट्रोलचा मुद्दा देशभरात गाजत आहे. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येत आहे. E20 पेट्रोलला अनेकांकडून विरोध केला जात आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत मोठी माहिती सांगितली.

इथेनॉल अर्थात E20 मिश्रित पेट्रोलबाबत विविध चर्चा सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीने याविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी दर्शवली आहे. E20 पेट्रोलसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचा उद्धभवलेली समस्या यावर उपाय म्हणून E20 पेट्रोलकडे बघितले जात आहे. मात्र, या E20 पेट्रोलच्या मुद्द्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही विविध आरोप केले जात आहेत. E20 पेट्रोलसाठी नितीन गडकरी जास्त आग्रही आहेत. कारण पेट्रोलच्या किमती जागतिक बाजारात ठरतात. इथेनॉल पेट्रोलच्या किमती ठरवण्याचा अधिकार सरकारकडे आहे.
दरवर्षी भारत इतर देशांकडून कच्चे तेल आयात करण्यासाठी करोडो रूपये देतो. त्या पैशांची बचत करण्यासाठी इथेनॉल पर्याय असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला. नितीन गडकरी यांनी म्हटले की, जागतिक संकटात E20 इथेनॉल ब्लॅडिंग कार्यक्रमाने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत असताना वाचवण्याचे काम केले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसल्या. इथेनॉलच्या वापरामुळे भारतात फार जास्त किमती वाढवण्याची गरज सरकारला पडली नाही. सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलच्या किमती 125 रूपये प्रति लीटरपर्यंत पोहोचल्या शकतात. सध्या दिल्लीत प्रति लीटर पेट्रोलचा दर 95 आहे. तेच इथेनॉल पेट्रोल तुम्ही अगदी स्वस्तामध्ये म्हणजेच 70 रूपये प्रति लीटर खरेदी करू शकता.
इथेनॉल पेट्रोलच्या मुद्द्यात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दिल्लीत संसदेवर E20 पेट्रोलविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत तयारीही सुरू आहे. सरकार अजूनही E20 पेट्रोलसाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. नीट पेपरफुटीनंतर E20 पेट्रोलचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढताना दिसल्या. आता इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. पण सरकार E20 पेट्रोलसाठी आग्रही आहे. यावरून एक वाद निर्माण झाला.