Bihar Election: बिहारच्या रणांगणात उतरले भाजपाचे दिग्गज, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली मोठ्या विजयाची भविष्यवाणी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपाच्या समर्थनार्थ आज बिहारात जाहीर सभा घेतली, सीतामढी येते उमेदवाराच्या अर्ज भरण्याच्या सभेतही ते सामील झाले. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सारण जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले.

Bihar Election: बिहारच्या रणांगणात उतरले भाजपाचे दिग्गज, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली मोठ्या विजयाची भविष्यवाणी
Union Minister Prahlad Joshi
| Updated on: Oct 17, 2025 | 9:43 PM

बिहारच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार टीपेला पोहचला आहे. सर्व पक्ष आता जनतेचा कौल मिळवण्याासाठी मैदानात उतरले होते. अनेक केंद्रीय मंत्री बिहारच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच निवडणूक अर्ज दाखल करताना नेते हजर राहून उमेदवारांसाठी रॅली काढत आहेत. अशाच प्रकारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनासाठी सभा घेत भाषण केले. सीतामढी येथे पार्टीचे उमेदवाराचा अर्ज भरताना केलेल्या सभेत ते सामी झाले. त्यांच्या सोबत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील सामील झाले. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी उपस्थित जनसमुदाया समोर भाषण करीत एनडीएच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सभा घेतली आणि प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. या वेळी जोशी यांनी सांगितले आम्ही आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवू. जनता पीएम मोदी आणि सीएम नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला मोठ्या संख्येने आपला आशीर्वाद देणार आहे. काँग्रेस आणि आरजेडीची निती छोट्या पक्षांना अनादर करण्याची आहे असेही त्यांनी सांगितले.

येथे व्हिडीओ पाहा –

सारणमध्ये गृहमंत्री अमित शाह यांची जाहीरसभा

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सारण जिल्ह्यात जाहीरसभेला संबोधित केले. ते म्हणाले की गेल्या २० वर्षांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याला जंगलराजमधून मुक्त केले आहे. या विधानसभा निवडणूकीत एनडीए ऐतिहासिक जनादेशांसह पुन्हा सरकार स्थापन करेल. सारण लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भिखारी ठाकूर यांनी कर्मभूमी राहीली आहे. ही ती भूमी देखील आहे जेथे लोकांना लालूराबडीच्या जंगलराजची देखील आठवण देऊ शकते.

येथे पाहा पोस्ट –

बिहारचे लोक यंदा चौथी दिवाळी साजरी करणार

अमित शाह यांनी सांगितले की बिहारचे लोक यंदा चार वेळा दिवाळी साजरे करणार आहेत. एक पारंपारिक, दुसरी जेव्हा सरकारने जीविका दिदींच्या खात्यात १० हजार रुपये पाठवले, तिसरी जेव्हा सरकारने जीएसटी घटवला आणि चौथी दिवाळी १४ नोव्हेंबर रोजी होईल जेव्हा निकाल जाहीर होतील. यावेळी शाह यांनी केंद्र सरकारच्या योजनांचीही माहिती दिली. अमित शाह म्हणाले की मोदींनी अयोध्येत राम मंदिराची पुनर्निमाण केला. कलम ३७० हटवले.

असले लोक बिहारची सुरक्षा करु शकत नाहीत

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अतिरेकी देशात रक्ताची होळी खेळत होते. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर पीओकेच्या अतिरेकी अड्ड्यांना उद्ववस्थ केले. अमित शाह यांनी यावेळी शहाबुद्दीनच्या मुलाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की आरजेडीच्या यादीत डॉन राहिलेल्या शहाबुद्दीनच्या मुलाचे देखील नाव आहे. असे लोक बिहारची सुरक्षा करु शकत नाहीत.