Unlock-2 Guidelines | केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

अनलॉक-2 दरम्यान देशात काय उघडणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे.

Unlock-2 Guidelines | केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत (Unlock-2 Guidelines) घोषणा करण्यात आली आहे. अनलॉक-2 दरम्यान देशात काय उघडणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय, रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत. येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील (Unlock-2 Guidelines).

30 जूनला अनलॉक-1 चा कालावधी संपणार आहे. त्यामुळे केंद्राकडून अनलॉक-2 ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता काय सुरु काय बंद?

  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहणार
  • ऑनलाईन/दूरशिक्षणाला परवानगी
  • सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क बंदच राहणार
  • कोणतेही सामाजिक, राजकीय, खेळ यांसारखे मोठे इव्हेंट करण्यास मनाई
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी कायम
  • मेट्रो रेल, बार आणि इतर एकत्र जमण्याच्या जागा बंदच
  • दुकानांमध्ये जागेनुसार एकाचवेळी पाच जणांना प्रवेश, यावेळी सोशल डिस्टन्सचं पालन करणे अनिवार्य

हेही वाचा : Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

नाईट कर्फ्यूदरम्यान कोणाला सूट?

देशभरात या काळात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बाहेर पडण्यास सक्त मनाई असणार आहे. याला अत्यावश्यक सेवांचा अपवाद असेल. याबाबत अधिकच्या सूचना आणि नियम स्थानिक प्रशासनाकडून घोषित केल्या जातील.

– मर्यादित संख्येने स्थानिक विमानांना उड्डाण करण्याची आणि प्रवासी गाड्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

– औद्योगिक यूनिट्स, राष्ट्रीय आणि प्रादेशिक महामार्गांवर माल वाहतूक करणारी वाहनं, बस, गाड्यांना रात्री प्रवासाची मूभा असेल.

– वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित संख्येने आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– तसेच, राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासही सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नाही.

लॉकडाऊन केवळ कंटेनमेंट झोनमध्ये लागू

देशातील प्रतिबंधित क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. तसेच, हा लॉकडाऊन आणखी कठोर होणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाबतचे निर्णय संबंधित राज्य ठरवणार आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या अधिक सूचना स्थानिक प्रशासन गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जाहीर करेल. कोणता भाग कंटेनमेंट झोन असेल याबाबत देखील स्थानिक प्रशासनच परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल.

कंटेनमेंट झोनबाहेर जर कुठे कोरोना रुग्ण आढळला, तर त्याला बफर झोन बनवून त्याबाबत जिल्हा प्रशासन योग्य तो निर्णय घेईल.

केंद्र सरकराने या नव्या गाईडलाईन्स राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सूचनेनुसार तयार केल्या आहेत. तसेच, संबंधित मंत्रालय आणि विभागांशीही याबाबतची चर्चा करण्यात आली आहे.

Unlock-2 Guidelines

संबंधित बातम्या :

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *