Yogi Adityanath : शपथ घेतल्यानंतर सुवेंदू योगींना भेटायला आले, त्यावेळची योगींची कृती बनली चर्चेचा विषय, त्यात खूप मोठा संदेश
Yogi Adityanath : सुवेंदू मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येक नेत्याला भेटत होते. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ते योगी आदित्यनाथ यांच्या जवळ गेल्यानंतर योगींनी जे केलं, ती कृती चर्चेचा विषय बनली आहे. त्यात खूप मोठा संदेश दडलेला आहे.

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुवेंदू यांनी भवानीपूर सीटवरुन माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हरवलं. शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी सर्व नेत्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गळ्यातील गमछा काढून तो सुवेंदू यांच्या गळ्यात घातला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला हा भगवा गमछा एक खास भेट असून त्यात खूप मोठा संदेश दडलेला आहे. कलकत्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर हा शपथ ग्रहण सोहळा झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणाला स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. त्यावेळी पीएम मोदींनी त्यांना मिठी मारुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सुवेंदू मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येक नेत्याला भेटत होते. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ते योगी आदित्यनाथ यांच्या जवळ गेल्यानंतर योगींनी आपल्या गळ्यातील गमछा काढून त्यांना घातला. यात हिंदुत्वाचा एक महत्वाचा संदेश आहे.
यात संदेश काय?
योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये येऊनही प्रचार केला होता. सुवेंदू अधिकारी यांनी सुद्धा प्रखर हिंदुत्वाची भूमिका या निवडणुकीत मांडली. उत्तर प्रदेशात ज्या प्रमाणे गुन्हेगारांविरोधात बुलडोझरने कारवाई केली जाते. तशीच प्रथा आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहायला मिळू शकते. गमछा देणं म्हणजे तोच हिंदुत्वाचा वारसा पुढे चालवणं असा संकेत म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी भाजपत प्रवेश कधी केला?
सुवेंदू अधिकारी आधी तृणमुल काँग्रेसमध्ये होते. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत खास माणसांमध्ये त्यांची गणना व्हायची. 2020 साली त्यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली. तळागाळातील जनता, कार्यकर्त्यांशी सुवेंदू अधिकारी यांचा थेट जनसंपर्क आहे. त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये यावेळी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.