मुसळधार पावसाचा कहर, 100 वर्ष जुनं घर कोसळलं; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

shocking : उत्तर प्रदेशमध्ये 100 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसाचा कहर, 100 वर्ष जुनं घर कोसळलं; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
| Updated on: Aug 06, 2026 | 8:49 AM

भिवंडीत काही दिवसांपूर्वी इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भिवंडीनंतर आता उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये महुली भागात मुसळधार पावसामुळे 100 वर्ष जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महुली मोहल्ला भागात घर कोसळल्याची घटना घडली आहे. या मुसळधार पावसादरम्यान एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण जखमी झाला आहे. कुटुंबातील सर्व जण एकाच घरात झोपले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत एक जोडपे, त्यांचा मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे 100 वर्ष जुनं घर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या पूनम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, घरात संपूर्ण कुटुंब झोपलं होतं. त्यावेळी अचानक छत कोसळलं. घराच्या वरचा मजला हा तब्बल 7 जणांवर कोसळला. सर्व झोपेत असल्याने कोणाला कुठे पळता आले नाही. या घटनेत 2 लहान मुलांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भिवंडीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू 

दरम्यान, भिवंडीत काही दिवसांपूर्वी ४ मजली इमारत कोसळली. ही इमारत रात्री साडेअकराच्या सुमारास पत्ताच्या बंगल्यासारखी कोसळली. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदत कार्य केलं. या घटनेत 10 दहा जणांचा मृत्यू झाला. तर सरकराकडून मृतांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या इमारतीत दोन अपार्टमेंटमध्ये दोन इमारत होत्या. दोन्ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर रहिवाशांना इमारत खाली करणयाचे आदेश देले आहेत. या घटनेप्रकरणी दोषींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता सरकारकडून इतर धोकादायक इमारती लवकर रिकामे करण्याते आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us