UP Election 2027 : 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? केशव मौर्य यांच्या उत्तराने योगी आदित्यनाथ यांना नक्कीच धक्का बसेल

UP VidhanSabha Election 2027 : सध्या देशात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे. भाजपसह सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. योगी आदित्यनाथ यूपीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

UP Election 2027 : 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? केशव मौर्य यांच्या उत्तराने योगी आदित्यनाथ यांना नक्कीच धक्का बसेल
yogi adityanath-keshav prasad Maurya
| Updated on: Nov 26, 2026 | 2:06 PM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे दिवस जस-जसे जवळ येत आहेत, तस-तशा राजकीय चर्चा, तर्क-वितर्कांचा बाजार गरम होऊ लागला आहे. भाजपसह सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? या बद्दलही अनेक राजकीय चर्चा सुरु आहेत. भाजपने सलग तिसऱ्यांदा यूपीची सत्ता मिळवली, तर भाजपकडून मुख्यमंत्री कोण असेल?. सध्या योगी आदित्यनाथ भाजपचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांचा पहिला अधिकार असेल असं अनेकांना वाटतय. पण भाजपने सत्ता मिळवली तर खरच योगी आदित्यनाथ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील का? की भाजपं कुठल्या नव्या चेहर्‍याला संधी देणार?. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी TV9 भारतवर्षशी एक्सक्लूसिव बोलताना या विषयावर मोठं वक्तव्य केलं. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, “मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं…सीएम पदाचा निर्णय विधिमंडळ पक्ष, केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय बोर्डाकडून होतो”

केशव प्रसाद मौर्य यांच्याशी TV9 भारतवर्षने एक्सक्लूसिव चर्चा केली. त्यावेळी त्यांना विचारलं की, 2027 साली सलग तिसऱ्यांदा भाजपने सरकार बनवलं, तर मुख्यमंत्री कोण होणार?.योगी आदित्यनाथ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार का?. केशव मौर्य किंवा अजून कोणी मुख्यमंत्री बनू शकतो? त्यावर केशव मौर्य म्हणाले की, “मुख्यमंत्री विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरतो आणि केंद्रीय नेतृत्वाकडून हा निर्णय घेतला जातो. मुख्मयंत्री कोणीही बनू शकतो” असं उत्तर त्यांनी दिलं.

Loading...

म्हणून ते असं बोलणं स्वाभाविक आहे

अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक वक्तव्य केलं. त्यामुळे केशव प्रसाद मौर्य यांचं वक्तव्य महत्वाचं ठरतं. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार, हे सर्वांना माहितीय असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. केशव प्रसाद मौर्य यांचं वक्तव्यातून मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त स्पर्धा असल्याचे संकेत मिळत आहे. त्याशिवाय योगीच पुन्हा विराजमान होतील अस त्यांनी ठामपणे म्हटलं नाही. केशव मौर्य यांना योगींच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले की, “योगी आदित्यनाथ हे वर्तमान मुख्यमंत्री आहेत, म्हणून ते असं बोलणं स्वाभाविक आहे”

केशव प्रसाद मौर्य यांनी अप्रत्यक्षपणे योगी आदित्यनाथ हे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे नाकारलं. त्यांनी या थेट प्रश्नावर विधिमंडळ पक्ष, केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय बोर्ड ठरवेल असं सांगितलं. मुख्यमंत्री कोणी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us