“आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!”, ‘अग्निपथ’वरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

| Updated on: Jun 18, 2022 | 5:02 PM

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आधी प्रहार, मग विचार हे वागणं बरं नव्हे!, अग्निपथवरून वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून सध्या दैश धुमसतोय. अश्यात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

वरुण गांधी काय म्हणाले?

अग्निपथ या नव्या योजनेवरून खासदार वरून गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अग्निपथ योजनेचा अभ्यास करता हेच लक्षात येतंय की, सरकाने ही योजना आणताना अनेक बाबींचा विचार केला नाही. महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा भारतीय सैन्य, सुरक्षा आणि तरूणांच्या भविष्यावर ‘आधी प्रहार, मग विचार’ हे वागणं संवेदनशील सरकारसाठी उचित नाही”, असं वरुण गांधी म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

योजना मागे घ्या- कन्हैय्या

“अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असं कन्हैय्याने म्हटलंय. शिवाय बिहारमध्ये बेरोजगारी दर जास्त आहे”, त्यावर कामन होणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या योजनेवर कन्हैयाने टीका केली आहे. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत”, असंही कन्हैय्या कुमारने म्हटलंय.