डाकू वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी

| Updated on: Mar 27, 2024 | 9:40 AM

Veerappan daughter Vidhya Rani Lok Sabha polls: विद्या राणी वकील आहे. जुलै 2020 मध्ये ती भाजपात दाखल झाली होती. भाजप युवा मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून तिने काम पाहिले. परंतु नुकतीच अभिनेता-निर्देशक सीमान यांच्या एनटीके पक्षात ती दाखल झाली. तिला कृष्णागिरी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

डाकू वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी
veerappan and vidhya rani
Follow us on

चंदन तस्कर डाकू वीरप्पन याने एक काळ गाजवला. त्याला पकडण्यासाठी अनेक राज्यांच्या पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु तो सापडत नव्हता. अखेर तामिलनाडूच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) 18 ऑक्टोंबर 2004 मध्ये एका चकमकीत त्याला ठार केले. चंदन तस्कर असलेल्या डाकू वीरप्पन चंदन तस्करीबरोबर अवैध शिकार करत होता. कन्नड अभिनेता राजकुमार आणि माजी मंत्री नागप्पा यांच्यासारख्या हायप्रोफाइल लोकांचे अपहरण केले होते. तामिळनाडू आणि कर्नाटकमधील जंगलांमध्ये त्याने धुमाकूळ माजवला होता. आता त्याची मुलगी विद्या राणी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. ती एनटीके या पक्षाची उमेदवार असणार आहे. तमिलर काची म्हणजेच एनटीकेकडून निवडणूक लढवण्यासाठी विद्या राणी हिने भाजपच्या राजीनामा दिला होता.

कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार

विद्या राणी वकील आहे. जुलै 2020 मध्ये ती भाजपात दाखल झाली होती. भाजप युवा मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून तिने काम पाहिले. परंतु नुकतीच अभिनेता-निर्देशक सीमान यांच्या एनटीके पक्षात ती दाखल झाली. तिला कृष्णागिरी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सीमन यांनी तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील 40 जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार आहेत.

वडील वीरप्पनसोबत एकदाच भेट

कायद्याचे शिक्षण घेतलेली विद्या राणी कृष्णागिरीमध्ये एक शाळा चालवते. तिने बंगळूरमधूनच कायद्याची पदवी घेतली आहे. विद्या राणी तिचे वडील वीरप्पन यांना फक्त एकदाच भेटली आहे. तिसरीत असताना अजोबा गोपीनाथम यांच्या घरी ही भेट झाली होती. 30 मिनटांची ही भेट होती. ती भेट अजूनही आपल्या लक्षात असल्याचे विद्या राणी हिने सांगितले. वीरप्पन याने तिला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचे तेव्हा म्हटले होते. विद्या राणीची आई मुथुलक्ष्मी राजकारणात आहे. ती टी वेलमुरुगन यांच्या पक्षात आहे.

हे सुद्धा वाचा

तामिळनाडूत कशी आहे तमिलर काची पक्षाची परिस्थिती

तामिळनाडूत तमिलर काची या पक्षाने प्रथम 2016 मध्ये निवडणूक लढवली. त्यावेळी या पक्षाला केवळ 1.1 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 4 टक्के मते मिळाली. 2021 मधील विधानसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण 6.7 टक्के गेले. त्यावेळी व्होट शेअरमध्ये ही तिसरी सर्वात मोठी पार्टी होती.