Video : रस्त्यावर बंद पडलेल्या स्कूल बसला पोलिसांनी दिला धक्का, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडून पोलिसांबद्दल आपसूकपणे कौतुकाचे 2 शब्द निघाल्याशिवाय राहणार नाहीत.

Video : रस्त्यावर बंद पडलेल्या स्कूल बसला पोलिसांनी दिला धक्का, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हरियाणा पोलिसांनी बंद पडलेल्या स्कूल बसला दिला धक्का
| Updated on: Mar 25, 2021 | 8:21 PM

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलचं मत अनेक प्रकारचं आहे. काही लोक पोलिसांचं कौतुक करतात तर काही त्यांच्यावर टीकाही करताना दिसतात. अनेकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नही विचारले जातात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडून पोलिसांबद्दल आपसूकपणे कौतुकाचे 2 शब्द निघाल्याशिवाय राहणार नाहीत.(Police push school bus off the road, video goes viral on social media)

पोलिसांच्या कामगिरी आणि भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात. मात्र, जर तुमच्या मनात पोलिसांबद्दल नकारात्मक मत असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्यात नक्की बदल कराल यात शंका नाही. डॉ. राजश्री सिंग यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना त्यांनी लिहिलंय की, ‘तुम्ही काही म्हणाल. हा व्हिडीओ अमेरिका पोलिसांचा नाही तर हरियाणा पोलिसांचा आहे. मदतीसाठी हातच हात, फक्त चलन कापण्यासाठी नाही. फरीदाबाद ट्राफिक पोलिसांचा व्हिडीओ आहे. हरियाणा पोलिस जिंदाबाद’. या व्हिडीओमध्ये काही पोलीस रस्त्यावर बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का देत बाजूला करत आहेत. या बसमध्ये अचानक काही समस्या निर्माण झाली होती. जेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांना त्याची माहिती मिळाली तेव्हा ते मदतीसाठी पोहोचले.

सोशल मीडियावर पोलिसांचं कौतुक

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 17 हजाराहून अधिक जणांनी पाहिलं आहे. तर 1 हजार 800 पेक्षा अधिक यूजर्सनी तो लाईक केला आहे. इतकच नाही तर काही यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहे. त्यात ‘तुमच्यासारख्या इमानदार आणि नेक पोलिसांना सलाम’, ‘हरियाणा पोलिसांचं शानदार काम’, तर एकाने ‘विश्वास होत नाही की असंही होऊ शकतं’, अशा कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

VIDEO | चालत्या रेल्वेत चढत होता माणूस, पुढे जे झालं ते अतिशय हादरवणारं, पाहा व्हिडीओ

Video : “ये भाई, जरा देख के चलो”, रोड सेफ्टीबाबत शंकर महादेवन यांचं खास गीत

Police push school bus off the road, video goes viral on social media