AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची जगभरात वाहवा, कठीण काळातही भन्नाट काम, मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून तोंडभरुन कौतुक

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे.

तुमची जगभरात वाहवा, कठीण काळातही भन्नाट काम, मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून तोंडभरुन कौतुक
| Updated on: Oct 30, 2020 | 6:18 PM
Share

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोव्हिड 19 विषाणू संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या तणावात आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचं मत नोंदवलं (Mumbai high court praise the Mumbai Police for working amid Covid-19 pandemic and lockdown).

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने गुरुवारी (29 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचं म्हटलं. तसंच त्यांची जगभरात वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात, असं मत नोंदवलं.

न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, “साथीरोगाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी खूप कठीण होती. मुंबई पोलीस आधीच खूप तणावात आहेत. त्यांना 12-12 तास ड्युटी करावी लागते. त्यानंतर येथे मिरवणूक, मोर्चे यांचा बंदोबस्त देखील असतो. अशा विपरीत परिस्थितीत मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांकडूनही त्यांना सहकार्य अपेक्षित आहे.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविरोधात शेरेबाजी प्रकरणाची सुनावणी करताना निरिक्षण

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर नवी मुंबईतील सुनैना होळे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने ही निरिक्षणं नोंदवली आहेत. होळे यांनी मुंबई पोलिसांनी नोंदवलेले 3 गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. सुनैना यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त शेरेबाजी केली होती. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुरुवारी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद करताना सरकारी वकील जयेश याग्निक म्हणाले, “सुनैना होळे यांना मुंबई पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. तसेच बीकेसी सायबर पोलिसांसमोर चौकसीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, होळे उपस्थित राहिल्या नाहीत.” होळे यांच्या वकिलाने युक्तीवाद केला की होळे यांची तब्येत खराब असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्या 2 नोव्हेंबरला पोलिसांसमोर हजर होतील.

न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत याचिकाकर्त्या सुनैना होळे यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

हेही वाचा :

संयमाचे बक्षीस! महिलेच्या मारहाणीनंतरही धैर्य, हवालदार एकनाथ पार्टे यांचा गृहमंत्र्यांकडून सत्कार

TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश

संबंधित व्हिडीओ :

Mumbai high court praise the Mumbai Police for working amid Covid-19 pandemic and lockdown

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.