भारतातील असं एक गाव जिथे प्रेग्नेंट होण्यासाठी येतात परदेशी महिला; शरीरसंबंधासाठी पैसेही देतात, आहे खास कारण

युरोपीयन देशातील अनेक महिला या गावात केवळ गर्भधारणेसाठी येतात, त्यासाठी त्या स्थानिकांना पैसे देखील देतात.

भारतातील असं एक गाव जिथे प्रेग्नेंट होण्यासाठी येतात परदेशी महिला; शरीरसंबंधासाठी पैसेही देतात, आहे खास कारण
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 10:00 PM

भारताचा केंद्र शासित प्रदेश असलेला लडाख हा नैसर्गिक सुंदरता आणि तेथील खडकाळ डोंगरांसाठी ओळखला जातो. लडाख हे भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक लडाखला भेट देतात. पर्यटकांमध्ये भारतीयच नाही तर मोठ्या संख्येनं विदेशी नागरिकांचा देखील समावेश असतो. मात्र आज लडाखबद्दल आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत, जी अनेकांना माहिती नसेल.मीडिया रिपोर्टनुसार लडाखमध्ये असं एक गाव आहे, जीथे परदेशी महिला या केवळ प्रेग्नेंट होण्यासाठी येतात.

लडाखमध्ये कारगिलपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.या गावाचं नाव आर्य व्हॅली असं आहे. या गावाबाबत असा दावा केला जातो की या गावात परदेशी विशेषकरून युरोपियन देशातील महिला या फक्त प्रेग्नेंट होण्यासाठी येतात. त्यांची इच्छा असते की या गावात राहणाऱ्या पुरुषांचं मुलं आपल्या पोटी जन्माला यावं.ऐकायला हे थोडं विचित्र वाटत असलं तरी येथे कायम परदेशी महिलांची गर्दी असते. याला कारण म्हणजे यामागे असलेला एक समज आहे.

गर्भ धारणेसाठी का येतात महिला?

लडाखमध्ये असलेल्या या आर्य व्हॅली गावात ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या लोकांबाबत बोलताना असं म्हटलं जातं की हे ब्रोकपा जमातीचे लोकं अलेक्झांडर द ग्रेट अर्थात सिकंदरच्या सैन्याचे वंशज आहेत. एवढंच नाही तर असा दावा देखील केला जातो की या जमातीतील नागरिक जगातील शेवटचे शुद्ध आर्य आहेत. सिकंदर जेव्हा भारतात आला होता, तेव्हा तो आपल्यासोबत प्रचंड सैन्य घेऊन आला होता, मात्र त्याच्या सौन्यातील काही लोक हे भारतातच राहिले या सैन्याचे वंशज म्हणजेच ही ब्रोकपा जमात आहे, असं मानलं जातं.

युरोपीयन देशातील अनेक महिलांची अशी इच्छा असते की आपल्या पोटी जन्माला येणारं मुलं हे शुद्ध आर्य वंशातील उंचेपुरे आणि सशक्त असावं, त्यामुळे या महिला केवळ गर्भ धारणेसाठी या गावात येतात. प्रेग्नेंन्सी नंतर या महिला पुन्हा आपल्या देशात परत जातात. सुरुवातीला या लोकांबद्दल फार थोड्या युरोपीयन महिलांना माहिती होती. मात्र त्यानंतर सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या वापरामुळे या जमातीची माहिती या महिलांना सहज उपलब्ध झाली, आणि येथे येणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढली. या महिला आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी या लोकांना पैसे देतात.

ब्रोकपा जमातीच्या लोकांकडून देखील ते शुद्ध आर्य असल्याचा दावा करण्यात येतो, मात्र याबाबत अद्याप कुठलाही अधिकृत पुरावा समोर आलेला नाहीये. मात्र त्यांची शरीराची ठेवण आणि उंची तसेच जुन्या कथांनुसार ते शुद्ध आर्य असल्याचा दावा केला जातो.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.