
मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. ही घटना दुपारी 1.45 ला घडली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. गंगोत्री पर्वतातून वाहणाऱ्या खीर गंगा नदीला मोठा पूर आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबतच मोठा ढिगारा देखील आला आणि 34 मिनिटांमध्येच थरावी गावात काहीच राहिले नाही. या घटनेचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ही ढगफुटीची घटना किती जास्त भयानक होती, हे व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. या घटनेत 4 जणांचा जीव गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, या ढगफुटीच्या घटनेनंतर अजूनही 20 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध हा घेतला जातोय. राज्यातील अनेक भाविक हे उत्तराखंडमध्ये फसल्याचीही माहिती मिळतंय. कुटुंबिय त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांना परत लवकर आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह लष्कराच्या तुकड्यांकडून बचावकार्य राबवले जात आहे. अनेकांना या घटनेतून वाचवण्यात यश आलंय.
”People fleeing from homes to stay alive, but many were seen being swept away in no time”
Massive devastation in Dharali village near Gangotri Dham, likelihood of many people being killed, may God protect everyone 🙏🏻🙏🏻#Uttarakhand #Uttarkashi #Cloudburst #Dharali pic.twitter.com/v4IFLkzQXp
— Sumit (@SumitHansd) August 5, 2025
उत्तरकाशीमध्ये ही घटना घडण्याच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अचानक मंगळवारी ढगफुटी झाली आणि मोठा ढिगारा थरावी गावाच्या दिशेने आला. या घटनेने गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. काही क्षणात पूर्ण गाव पाण्याखाली गेले. या घटनेनंतर काही लोक ढगाऱ्यात दबले गेले. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, 20 लोक बेपत्ता असून त्यांच्या शोध हा घेतला जातोय.
या ढगफुटीच्या घटनेनंतर ज्यावेळी पाणी निघून गेले, त्यावेळी काही लोक हे चिखलातून रेंगत आपला जीव वाचवून येताना दिसली. पुढेही जोरदार पावसाची शक्यता असल्याने गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. ढगफुटी म्हणजे पाण्याचे कण किंवा बर्फ जे आकाशात तरंगताना दिसतात. जेव्हा पाण्याचे खूप लहान कण वाफेच्या किंवा बाष्पाच्या स्वरूपात वातावरणाच्या वरच्या पृष्ठभागावर पोहोचतात आणि थंड वाऱ्यांमध्ये मिसळतात तेव्हा साधारणपणे ढगफुटीची घटना घडते. मात्र, या घटनेचा धक्कादायक असा व्हिडीओ व्हायरल झालाय.