अदानींच्या विंझिजम बंदरावर जगातील सर्वांत मोठ्या कंटनेर शीपचे स्वागत, ‘MSC तुर्किये’ची विशेषता काय?

विंझिजम या देशातील पहिल्या सेमिअॅटोमॅटिक बंदरावर जगातील सर्वांत मोठ्या इको फ्रेंडली कंटेनर शीपचे स्वागत करण्यात आले.

अदानींच्या विंझिजम बंदरावर जगातील सर्वांत मोठ्या कंटनेर शीपचे स्वागत, MSC तुर्कियेची विशेषता काय?
MSC turkiey ship
| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 8:43 PM

विंझिजम या देशातील पहिल्या सेमिअॅटोमॅटिक बंदरावर जगातील सर्वांत मोठ्या इको फ्रेंडली कंटेनर शीपचे स्वागत करण्यात आले. या कंटनेर शीपचे नाव MSC तुर्किये असं आहे. विंझिजम हे बंदर अदानी समूहाचे आहे. जगातील सर्वात मोठे इको फ्रेंडली शिप MSC तुर्किये हे जहाज बुधवारी (9 एप्रिल) विंझिजम बंदरावर आले.

भारतासाठी महत्त्वाची बाब

जगातील सर्वांत मोठे इको फ्रेंडली कंटेनर शीप हे पहिल्यांदाच दक्षिण आशियात आले आहे. MSC तुर्कियेच्या या प्रवासाला भारताच्या शिंपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील एक महत्त्वाची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

24,346 कंटेनर घेऊन जाण्याची शीपमध्ये क्षमता

एमएससी तुर्किये हे जहाज मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (MSC) या कंपनीच्या मालकीचे आहे. या जहाजाची लांबी 399.9 मीटर तर रुंदी 61.3 मीटर सोबतच खोली 33.5 मीटर आहे. या जहाजात एकाच वेळी 24,346 कंटेनर घेऊन जाण्याची क्षमता आहे. याच कारणामुळे हे जहाज जगातील सर्वांत मोठ्या कंटेनर शीपपैकी एक आहे.

विंझिजम बंदराचे महत्त्व काय?

विंझिजम इंटरनॅशनल बंदर हे अदाणी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेड (APSEZ) यांच्या मालकीचे आहे. हे बंदर देशातील पहिले मेगा ट्रान्सशिपमेंट कंटेनर टर्मिनल आहे. हे बंदर उपमहाद्विपातील एकमेव ट्रान्सशिपमेंट हब आहे. हे बंदर जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या जवळ आहे. हे बंदर पूर्व-पश्चिमेतील शिपिंग चॅनेलच्या फक्त 10 मैलच्या दुरीवर आहे.