AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ज्याची भीती होती अखेर तेच घडलं; जगात तिसऱ्या युद्धाला सुरुवात, 24 तासांमध्ये 1900 हल्ले, थेट…

एकीकडे आधीच जगात दोन मोठी युद्ध सुरू आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध देखील थांबलं नाही, त्यातच आता जगात तिसरं युद्ध सुरू झालं आहे. 24 तासांमध्ये 1900 पेक्षा जास्त हल्ले करण्यात आले आहे.

मोठी बातमी! ज्याची भीती होती अखेर तेच घडलं; जगात तिसऱ्या युद्धाला सुरुवात, 24 तासांमध्ये 1900 हल्ले, थेट...
Houthi rebels Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 3:39 PM
Share

एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, गेल्या पाच वर्षांपासून हे युद्ध सुरूच आहे. त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. या युद्धामध्ये युक्रेन आणि रशियाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेनं या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्यात आले. दरम्यान दुसरीकडे अमेरिका आणि इराणमध्ये देखील युद्ध सुरूच आहे. 28 फेब्रुवारी रोजी या युद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे इराणकडून देखील आखातामध्ये ज्या -ज्या ठिकाणी अमेरिकेची सैन्य तळं आहेत, त्या -त्या ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. या युद्धात अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान एकीकडे रशिया आणि युक्रेन तसेच अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना आता जगात तिसरं युद्ध सुरू झालं आहे. ते म्हणजे यमनकडून हुती बंडखोरांवर हल्ले करण्यात आले आहेत. यावेळी सौदी अरेबियाने देखील यमनला मदत केली आहे. यमनकडून हुती बंडखोरांवर हल्ले सुरू असतानाच सौदी अरेबियाने देखील एअर स्ट्राईक केला आहे. यमन सरकारच्या दाव्यानुसार गेल्या 24 तासांमध्ये जिथे-जिथे हुती बंडखोर आहेत, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल 1900 पेक्षा जास्त हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये 1,150 हुन अधिक हुती बंडखोरांचा खात्मा झाला आहे. दरम्यान याला प्रत्युत्तर म्हणून हुती बंडखोरांकडून देखील यमनवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. मात्र या युद्धात सध्या तरी यमन वरचढ ठरल्याचं पहायला मिळत असून, यमनने हुती बंडखोरांचं शस्त्रभंडार ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच हुती बंडखोरांना ज्या-ज्या मार्गाने रसद पुरवली जात होती, ते सर्व मार्ग बंद केले आहेत.

यमनच्या प्रवक्त्याकडून असा दावा करण्यात आला आहे की, यमनचं सैन्य पुढे जात आहे. हुती बंडखोरांचं वचर्स्व असलेली अनेक ठिकाणं यमनच्या सैन्यांनी ताब्यात घेतली आहे. बाब- अल-मंदेब स्ट्रेट परिसरात जोरदार युद्ध सुरू आहे. हुती बंडखोरांनी ज्या प्रदेशावर कब्जा केला होता, ते -ते प्रदेश आता ताब्यात घेण्यात आले आहेत, असा दावा यमन सरकारकडून करण्यता आला आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु