रात्रभर मृत्यूचे तांडव, रेल्वे स्टेशनचा छत कोसळला, मोठी खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..

हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच निसर्गाने मोठे थैमान घातले आहे. चक्रीवादळ आणि अतिमुसळधार पावसाच तब्बल 31 जणांचा जीव गेला. उत्तर प्रदेशमध्ये स्थिती गंभीर आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नवा मोठा इशारा दिला.

रात्रभर मृत्यूचे तांडव, रेल्वे स्टेशनचा छत कोसळला, मोठी खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
Heavy Rainfall
| Updated on: May 30, 2026 | 10:53 AM

चक्रीवादळाने मोठा हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी रात्री मोठ्या चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादळात तब्बल 31 लोकांचा मृत्यू झाला. चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस झाला. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने झोप उडवणारा इशारा दिला. 1 जूनपर्यंत 60 ते 80 ताशी वेगाने वारे येईल. उत्तर प्रदेशमध्ये निसर्गाने थैमान घातले. सहारनपुरमध्ये शाकंभरी देवी मंदिर परिसरात अचानक पाणी वाढले. ज्यात महिला वाहून गेली. अतिमुसळधार पावसात दुकाने, वाहने आणि पुल वाहून गेला. लखनऊच्या चारबाग स्टेशनवर प्लेटफॉर्मवर शेड पडला, ज्यात टीटीईसोबतच अन्य लोक जखमी झाले. चक्रीवादळ इतके जास्त भयंकर होते काही सर्वकाही हालत होते. लोक आपली जीव वाचून लपताना दिसले. प्रयागराज जिल्ह्यात तब्बल 8 लोकांचा मृत्यू झाला.

सलग दुसऱ्या दिवशी चक्रीवादळाने उत्तर प्रदेशमध्ये थैमान घातले. कालही थेट पुलाचे काम सुरू असताना चक्रीवादळामुळे अख्या मोठा पुलच कोसळला. उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांना मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. आज महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मात्र, यादरम्यान चक्रवादळ नसेल.

उत्तर प्रदेशच्या हमीरपुरमध्ये जोरदार वारे आणि पाऊस झाला. तिथे भयंकर घटना घडली. अचानक हवामानात बदल झाल्याने बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू होते. रात्री 3 वाजता अचानक जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला. काही क्षणात परिस्थिती बदलून गेली आणि सर्वकाही हालत होते. यादरम्यानच बेतवा नदीवरील पुल कोसळला. ज्यात अनेकांचा जीव गेला.  उत्तर प्रदेशमध्ये या चक्रीवादळाचा इतका मोठा फटका बसत आहे की, 31 लोकांचा जीव गेला.

शिवाय मोठे नुकसानही होत आहे. अतिमुसळधार पाऊस झाल्याने थेट नद्यांना पुर येत आहे. शिवाय पावसासोबतच चक्रीवादळ असल्याने मदतकार्य राबवताही येत नाही. प्रशासनाकडून नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा मोठा इशारा देण्यात आला. 1 जूनपर्यंत संकट कायम असणार आहे. उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही चक्रीवादळाचा प्रभाव बघायला मिळत आहे. पुढील 24 तास अत्यंत धोक्याची आहेत.

Follow Us