AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रभरात मृत्यूचे तांडव, थेट नदीवरील पुल कोसळला, ढिगाऱ्याखाली असंख्य लोक, तब्बल इतक्यांचा मृत्यू..

निसर्गाचे एक रौद्ररूप बघायला मिळत आहे. चक्रीवादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. थेट 6 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले. थेट नदीवरील पुल कोसळला आहे. अनेक लोक ढिसाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

रात्रभरात मृत्यूचे तांडव, थेट नदीवरील पुल कोसळला, ढिगाऱ्याखाली असंख्य लोक, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
bridge collapsed due to the cyclone
| Updated on: May 29, 2026 | 9:44 AM
Share

वादळी वाऱ्याने मोठे थैमान घातले. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह मोठा पाऊस झाला. ज्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. मोठे नुकसानही झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये निसर्गाने थैमान घातले. उत्तर प्रदेशच्या हमीरपुरमध्ये अचानक जोरदार वारे आणि पाऊस आला. त्याने भयंकर घटना घडली. अचानक हवामानात बदल झाला. बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू होते. रात्री 3 वाजता अचानक जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला. सर्वत्र धुळ आणि जोरदार वाऱ्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही क्षणात परिस्थिती बदलून गेली आणि सर्वकाही हालत होते. यादरम्यानच बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू असतानाच पुल पडला. काही लोक पिलरवर अडकली. 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, मोठे तूफान असल्याने मदतकार्य करण्यास उशीर झाला. मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याकरिता क्रेनची मदत घेतली जात आहे.

प्रशासनाकडून प्रयत्न केली जात आहेत की, जास्तीत जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढता येईल. हेच नाही तर उत्तर प्रदेशच्या अन्य काही भागातही या वादळीवाऱ्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काैशांबीमध्ये वादळीवाऱ्यामुळे घर पडून 3 लोकांचा मृत्यू झाला. रायबरेलीमध्ये पुराच्या पाण्यात 1 महिला वाहून गेली.

योगी आदित्यनाथ यांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळ थैमान घालताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मोठ्या चक्रीवादळाने नुकसान झाले असतानाच रात्री 3 वाजता पुन्हा चक्रीवादळ धडकले. एक एक करून या प्रकरणातील माहिती पुढे येत आहे. प्रशासनाकडून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले, तिथे मदतकार्य पोहोचवले जात आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल