AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... मनोज जरांगे पहिल्यांदाच रडले

समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला… मनोज जरांगे पहिल्यांदाच रडले

| Updated on: May 30, 2026 | 10:31 AM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून, सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून, सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उपोषणापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. “मी समाजासाठी मरायला तयार आहे, लढायला तयार आहे. त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मी मागे हटणार नाही,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांत अश्रू आले. या भावनिक क्षणामुळे उपस्थितांमध्येही गंभीर वातावरण निर्माण झाले.
“चांगल्या कामाला शेवट नसतो,” असे म्हणत त्यांनी आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला. त्याचवेळी अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले. काल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, अंतरवाली सराटीत मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे. समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून भावूक झाल्याची प्रतिक्रिया स्वतः जरांगे पाटील यांनी दिली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि स्पष्ट अंमलबजावणीचा कालावधी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

 

 

Published on: May 30, 2026 10:31 AM
Follow Us