कलिंगडाची दहशत! भल्या पहाटे खाताच थेट मृत्यू; मुंबईनंतर आणखी एक भयंकर घटना!

काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. आता आणखी एक घटना समोर आली आहे. कलिंगड खाल्यामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाचा संशय व्यक्त केला जात आहे.

कलिंगडाची दहशत! भल्या पहाटे खाताच थेट मृत्यू; मुंबईनंतर आणखी एक भयंकर घटना!
कलिंगड
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 16, 2026 | 2:54 PM

काही दिवसांपूर्वी मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, आता अशीच एक धक्कादायक आणि धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. छातीतील जळजळ आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड खाणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले असून, वडिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचा तरुण मुलगा सध्या आयसीयूमध्ये (ICU) मृत्यूशी संघर्ष करत आहे.

नक्की काय घडलं?

ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील श्योपूर शहरात घडली. येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ राहणारे ४३ वर्षीय इंद्रसिंग परमार हे कार चालक म्हणून काम करायचे. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर इंद्रसिंग आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा विनोद या दोघांनाही छातीत जळजळ होण्याचा त्रास सुरू झाला. परंतु, नेहमीचाच त्रास समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते झोपी गेले. शुक्रवारी सकाळी सकाळी पुन्हा तोच त्रास वाढल्याने, वाढत्या उष्णतेमुळे पोटात जळजळ होत असावी असा अंदाज त्यांनी बांधला. पोट थंड राहावे म्हणून त्यांनी बाजारातून कलिंगड आणले आणि दोघांनीही ते खाल्ले.

वाचा: माणसाचे मांस खाणारी जगातील एकमेव डाळ माहितीये का? आपल्या रोजच्या जेवणात आहे समावेश

कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती खालावली

पोट शांत करण्यासाठी खाल्लेले कलिंगड त्यांच्यासाठी काळ ठरेल, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच बाप-लेकाची प्रकृती कमालीची बिघडली. दोघांनाही तीव्र अस्वस्थता जाणवू लागली आणि मोठ्या प्रमाणात उलट्या सुरू झाल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी राजस्थानमधील कोटा येथे हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून कोटा येथे जात असतानाच, वाटेत इंद्रसिंह यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांनी रस्त्यातच जीव सोडला. दुसरीकडे, मुलगा विनोद याला कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहे.

डॉक्टरांचा संशय

या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी केवळ कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता नाकारली आहे. डॉक्टरांच्या मते, हा प्रकार गंभीर फूड पॉयझनिंग (अन्नबाधा) किंवा शरीरात आधीच झालेल्या एखाद्या घातक संसर्गामुळे (Infection) घडला असावा.

Follow Us