Weather update : थंडी अन् पावसाचा डबल धमाका, 10 राज्यांना मोठा अलर्ट, ताज्या अंदाजात धुक्यानंही टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात…

Weather update news: देशातील 10 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा जोर वाढणार असून दक्षिण भारतातही पावसाचा अंदाज आहे. जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज.

Weather update : थंडी अन् पावसाचा डबल धमाका, 10 राज्यांना मोठा अलर्ट, ताज्या अंदाजात धुक्यानंही टेन्शन वाढवलं, महाराष्ट्रात...
Weather update today
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 8:14 PM

नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांत देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत असून दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये सकाळी दाट धुके पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अकवान अन् इतर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह 10 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू असून पुढील काही दिवसांत मैदानी भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात थंडी वाढणार

दिल्लीमध्ये रविवारी सकाळी तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. आज कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 14 अंश राहण्याचा अंदाज आहे. नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही धुके राहण्याची शक्यता आहे.

Loading...

उत्तर प्रदेशातील मथुरा, आग्रा, बरेली, कानपूर, सहारनपूर आणि रामपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात आज आणि उद्या दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हवामान कोरडे राहील. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हवामान कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहणार आहे. डिंसेबरच्या सुरुवातीला थंडीची लाट येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे.

बिहारमधील सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार आणि भागलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भागलपूर आणि कटिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. झारखंडमधील सात जिल्ह्यांमध्येही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.

डोंगराळ भागात बर्फवृष्टी

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लू, मनाली, चंबा आणि किन्नौरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळमध्ये 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा अंदाज आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही भागांत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us