Marriage: ‘या’ राज्यात मुलगा जातो नांदायला, सासरी जाऊन करतो संसार; परंपरा वाचून आश्चर्य वाटेल!

प्रत्येक समाजात नवरी मुलगी ही मुलाच्या घरी नांदायला जाते. ही प्रथा शतकानुशतके जुनी आहे आणि ती आजही चालू आहे. मात्र भारतात एक असे राज्य आहे जिथे ही परंपरा पाळली जात नाही. या ठिकाणी लग्नानंतर मुलींना नव्हे तर मुलांना सासरी जावे लागते.

Marriage: या राज्यात मुलगा जातो नांदायला, सासरी जाऊन करतो संसार; परंपरा वाचून आश्चर्य वाटेल!
Marriage Tradition
| Updated on: Sep 29, 2025 | 5:12 PM

जगात वेगवेगळ्या ठिकाणी लग्नात विविध परंपरा पाळल्या जातात. जवळपास प्रत्येक समाजात नवरी मुलगी ही मुलाच्या घरी नांदायला जाते. ही प्रथा शतकानुशतके जुनी आहे आणि ती आजही चालू आहे. मात्र भारतात एक असे राज्य आहे जिथे ही परंपरा पाळली जात नाही. या ठिकाणी लग्नानंतर मुलींना नव्हे तर मुलांना सासरी जावे लागते. भारतातील मेघालय राज्यात ही परंपरा पाळली जाते. इथे पुरुषांना त्यांचे घर सोडून जावई म्हणून त्यांच्या पत्नीच्या घरी जावे लागते. कारण या ठिकाणी मुलांना नव्हे तर मुलींना पालकांची संपत्ती मिळते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मेघालयात मुलगा जाते नांदायला

मेघालय हे मातृसत्ताक राज्य आहे असे आपण म्हणून शकतो. या राज्याच्या कारण काही भागात खासी जमात राहते. ही जमात मुलीचा जन्म झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करते. मात्र या समाजात मुलाचा जन्म अशुभ मानला जातो. या समाजात लग्नानंतर मुले त्यांच्या पत्नीच्या घरी जातात, तिथे गेल्यावर ते पत्नीच्या कुटुंबाची काळजी घेतात. तसेच या ठिकाणी मुलांना त्यांच्या आईचे आडनाव लावावे लागते. महत्त्वाची बाब म्हणजे या समाजातील लग्नात हुंडा घेतला जात नाही.

महिला अनेक विवाह करतात

मेघालयातील खासी जमातीत अनेक विचित्र प्रथा आणि परंपरा आहेत. येथे मुलींवर कोणतेही बंधन नाही. या समाजातील महिला अनेक पुरुषांशी लग्न करू शकतात. या समाजातील अनेक महिला भाजीपाला, मांस आणि इतर दुकाने चालवतात. तसेच येथील दारुच्या दुकानांची मालकीही महिलांकडे आहे. त्यामुळे या समाजात महिलांवर मोठी जबाबदारी आहे.

मुलींना मिळते संपत्ती

खासी जमातीत मुलींच्या नावावर संपत्ती असते. कारण मुली पालकांची जबाबदारी सांभाळतात. तसेच या समाजातील महिला या कुटुंबातील सर्व प्रमुख निर्णय घेतात. समाजात संतुलन निर्माण करण्यासाठी खासी समाजात ही प्रथा सुरु झाल्याचे मानले जात आहे. येथील अनेक पुरुषांनी ही प्रथा बदलण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप यात फारसा बदल झालेला नाही.